loader image
[ays_poll id=7]

राज्यसभा निवडणूक निकाल – महविकास आघाडी व भाजपा प्रत्येकी ३ जागांवर विजयी

Jun 11, 2022

मुंबई – राज्यसभेच्या सहा जागांसाठी प्रथमतः एकतर्फी वाटणाऱ्या निवडणुकीत भाजपने दणदणीत विजय मिळवला आहे. भाजपचे धनंजय महाडिक विजयी झाले असून शिवसेनेच्या संजय पवार यांचा पराभव झाला आहे. त्यामुळे भाजपचे 3 उमेदवार विजयी झाले आहेत.

महाविकास आघाडीने तीन तर भाजपनेही 3 जागा जिंकल्या असून काल झालेल्या मतदानानंतर दोन्ही बाजूंनी पाच जणांच्या मतपत्रिकेवर आक्षेप नोंदविण्यात आले होते त्यामुळे तब्बल नऊ तासानंतर या निवडणुकीच्या मतमोजणीला रात्री दोनला सुरुवात झाली. त्यानंतर चार वाजता सर्व निकाल समोर आले आहे. पहिले मतपत्रिकेची छाननी झाली. त्यात २८४ मतपत्रिका वैध ठरल्या. त्यातून शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसचा प्रत्येकी एक असे एकुण महाविकास आघाडीचे तीन तर भाजपचे तीन उमेदवार विजयी झाले. या निवडणुकीत पहिल्या फेरीत पाच उमेदवार निवडून आले.

त्यात
संजय राऊत ( शिवसेना) – ४१ ( विजयी )
प्रफुल्ल पटेल( राष्ट्रवादी ) – ४३ ( विजयी )
इम्रान प्रतापगढी ( काँग्रेस ) – ४४ ( विजयी )
पियुष गोयल ( भाजप ) – ४८ ( विजयी )
अनिल बोंडे ( भाजप ) – ४८ (विजयी)
यांचा समावेश आहे. या पहिल्या फेरीत
संजय पवार( शिवसेना) – ३३ व धनजंय महाडिक ( भाजप ) – २६ यांंना मिळाले. पण, दुस-या पसंतीच्या मताचा महाडिक यांना फायदा झाला त्यात त्यांना ४१ मते मिळाली तर शिवसेनेचे संजय पवार हे पराभूत झाले.

आमदार सुहास कांदे यांचे मत बाद
नांदगाव विधानसभेचे शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांचे मत राज्यसभा निवडणुकीत बाद झाले आहे. या निवडणुकीत २८५ मतदान झाले होते. पण, कांदे यांचे मत बाद झाल्यानंतर २८४ मतांची मोजणी करण्यास केंद्रीय निवडणूक आयोगाने मान्यता दिली आहे. कांदे बरोबरच राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड, काँग्रेसचे यशोमती ठाकुर भाजपचे सुधीर मुनगंटीवार, अपक्ष आमदार रवी राणा यांच्या मतावरही आक्षेप घेण्यात आले होते.

पण, यात कांदे वगळून सर्वांवर असलेले आक्षेप फेटाळून लावले. त्यामुळे त्यांचे मत वैध झाले. कांदे यांचे मत हे शिवसेना नेते संजय राऊत यांना दिल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे त्यांचे एक मत कमी झाले आहे. कांदे यांनी मतपत्रिकेची घडी केली नाही. त्याचबरोबर त्यांनी शिवसेनेबरोबरच राष्ट्रवादीच्या प्रतिनिधीला मतपत्रिका दाखवल्याचा आक्षेप त्यांच्यावर होता.

अजून बातम्या वाचा..

नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या शहर पातळीवरील शालेय देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेला भरघोस प्रतिसाद

नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या शहर पातळीवरील शालेय देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेला भरघोस प्रतिसाद

मनमाड -- नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात...

read more
फलक रेखाटन – श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा !

फलक रेखाटन – श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा !

फलक रेखाटन - श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा ! फलक रेखाटन...

read more
मनमाड शहर भाजप मंडलाच्या वतीने सलग 21व्या वर्षी अखंड भारत दिनी निमित्त व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या जन्म दिना निमित्त आयोजित रक्तदान शिबीरात 30 रक्तदात्यांचे रक्तार्पण

मनमाड शहर भाजप मंडलाच्या वतीने सलग 21व्या वर्षी अखंड भारत दिनी निमित्त व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या जन्म दिना निमित्त आयोजित रक्तदान शिबीरात 30 रक्तदात्यांचे रक्तार्पण

मनमाड - 79 व्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्ये ला 14 ऑगस्ट या अखंड भारत दिना निमित्ताने...

read more
व्यसनाधीन तरुण देशाच्या शाश्वत विकासासाठी धोक्याचे जागतिक युवा दिनानिमित्त मनमाड महाविद्यालयात, पोस्टर रांगोळी व पथनाट्य यांचे सादरीकरण

व्यसनाधीन तरुण देशाच्या शाश्वत विकासासाठी धोक्याचे जागतिक युवा दिनानिमित्त मनमाड महाविद्यालयात, पोस्टर रांगोळी व पथनाट्य यांचे सादरीकरण

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या रेड रिबन क्लब, राष्ट्रीय...

read more
श्रावण मास अंगारक (मंगळी ) संकष्ट चतुर्थी निमित्त मंगळवार दिनांक 12/08/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात विशेष धार्मिक कार्यक्रमा चे आयोजन

श्रावण मास अंगारक (मंगळी ) संकष्ट चतुर्थी निमित्त मंगळवार दिनांक 12/08/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात विशेष धार्मिक कार्यक्रमा चे आयोजन

मनमाड - शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील...

read more
.