loader image
[ays_poll id=7]

नाशिक मंडळामध्ये वीजचोरीविरुद्ध मोहीम एकाच दिवसात २६१ जणांवर कारवाई ; मोहिमेतील पथकांमध्ये अभियंते, जनमित्रांचा समावेश

Jun 11, 2022

नाशिक: दि. १० जून २०२२ वीजचोरी व अनधिकृत वापराविरोधात महावितरण गंभीर असून, याविरोधात ठोस पाऊले उचलीत कारवाईचे सत्र सातत्याने सुरु ठेवीत ०८ जून २०२२ या एकाच दिवशी राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेमध्ये महावितरणच्या नाशिक मंडळात पथकाने वीज चोरी व गैरवापर करणाऱ्याविरुद्ध आकस्मिक कारवाई केली. यामध्ये २ हजार ४४ विद्युत ग्राहकांची मीटर तपासणी करण्यात येऊन त्यामध्ये नाशिक शहर १ व २, नाशिक ग्रामीण आणि चांदवड या चारही विभागामध्ये भारतीय विद्युत कायद्याच्या कलम १३५ नुसार २३६ जणांवर तर कलम १२६ नुसार २५ ग्राहकांवर अशा एकूण २६१ जणांवर कारवाई करण्यात आली आहे .
वीजहानी, गळती व वीजचोरी कमी करण्यासाठी जिल्ह्यात महावितरण सातत्याने प्रयत्नशील असून नाशिक परिमंडळाचे मुख्य अभियंता दिपक कुमठेकर यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक मंडळाचे अधिक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर यांच्या नेतृत्वाखाली कार्यकारी अभियंते धनंजय आहेर, माणिकलाल तपासे, राजाराम डोंगरे, रवींद्र आव्हाड यांचेसह विविध पथकामध्ये अभियंते, अधिकारी, कर्मचारी व जनमित्र यांनी या मोहिमेत सहभाग घेतला..
वीज मिटरमध्ये हस्तक्षेप करून थेट वीजचोरी करणाऱ्यांवर भारतीय विद्युत कायद्याच्या कलम १३५ नुसार कारवाई करण्यात आली यामध्ये नाशिक शहर १ मध्ये ०६, नाशिक शहर २ मध्ये ६२, नाशिक ग्रामीण मध्ये ९८, चांदवड मध्ये ७० जणांवर कारवाई करण्यात आली.
तर विजेचा गैरवापर व घेतलेल्या कारणाशिवाय दुस-या कारणासाठी वापर करीत असल्याचे आढळून आलेल्याविरुद्ध भारतीय विद्युत कायद्याच्या कलम १२६ नुसार कारवाई करण्यात आली. यामध्ये नाशिक शहर १ मध्ये ०५, नाशिक शहर २ मध्ये ०८, नाशिक ग्रामीण मध्ये ७, चांदवड मध्ये ५ जणांवर कारवाई करण्यात आली अशा प्रकारे एकूण कलम १३५ व कलम १२६ नुसार २६१ जणांवर कारवाई करण्यात आली आहे.
यामध्ये नाशिक मंडळातील २ हजार ४४ विद्युत ग्राहकांची मीटर तपासणी करण्यात आली होती. या मोहिमेमध्ये वीज देयक न भरणाऱ्या ज्या ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता अशा ठिकाणी सुद्धा बेकायदेशीर वीज वापर करताना आढळल्याने त्यांचे विरुद्ध सुद्धा कारवाई करण्यात आली.
वीजचोरी व गैरप्रकार याविरोधात महावितरण गंभीर असून यापुढे सुद्धा अशाप्रकारे गोपनीय पद्धतीने, सामूहिकरीत्या आणि सातत्याने आकस्मिक कारवाई करण्यात येणार आहे. तरी ग्राहकांनी वीजचोरी, अनधिकृत व गैरवापर टाळून अधिकृत वीज जोडणी घेण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.

अजून बातम्या वाचा..

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त बालदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त बालदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला

मनमाड -येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या...

read more
कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस 14 नोव्हेंबर बालदिन निमित्त पूर्वसंध्येला मनमाड धर्मग्रामाला भेट दिली

कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस 14 नोव्हेंबर बालदिन निमित्त पूर्वसंध्येला मनमाड धर्मग्रामाला भेट दिली

आज दिनांक 13 नोव्हेंबर 2025 रोजी नाशिक कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र...

read more
कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाअंतर्गत इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनात सर्वोत्तम कामगिरी करीत राज्यस्तरावर निवड झालेली आहे. 

कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाअंतर्गत इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनात सर्वोत्तम कामगिरी करीत राज्यस्तरावर निवड झालेली आहे. 

दिनांक :12/11/2025   कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या...

read more
मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न झाली....

read more
नामनिर्देशनपत्रातील माहितीसोबत संकेतस्थळावर कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही शनिवारी (ता. १५) देखील नामनिर्देशनपत्र स्वीकारणार

नामनिर्देशनपत्रातील माहितीसोबत संकेतस्थळावर कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही शनिवारी (ता. १५) देखील नामनिर्देशनपत्र स्वीकारणार

  मुंबई, दि. १३ - नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकांकरिता संकेतस्थळावर फक्त...

read more
एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद जयंती उत्साहात साजरी

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद जयंती उत्साहात साजरी

  *मनमाड (दि. ११ नोव्हेंबर) - एच.ए.के.हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, मनमाड येथे भारताचे पहिले...

read more
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक आयोजित

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक आयोजित

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी...

read more
.