loader image
[ays_poll id=7]

नांदगाव महसुल मंडळातील तलाठी युवराज मासुळे यास लाच घेतानां अटक

Jun 13, 2022

नांदगाव (सोमनाथ घोंगाणे) : याबाबत वृत असे की नांदगाव तालुका हा लाचखोरी साठी प्रसिद्व आहे. क्रांतीनगर येथील तक्रारदाराच्या जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर नाव लावण्यासाठी पाच हजार रूपये लाचेची मागणी करणाऱ्या नांदगाव येथील तलाठी युवराज मासुळे यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडल्याने महसूल विभागाचा कारभार चव्हाट्यावर आला आहे.
तक्रारदार यांनी नांदगाव येथील तलाठी युवराज रामदास मासुळे यांच्या कडे जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर नाव लावण्यासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र तलाठी मासुळे यांनी सदर सातबारा उताऱ्यावर तक्रारदारांचे नाव लावण्याच्या मोबदल्यात ५००० रुपयांची मागणी केली असता दोन हजार रूपये आगाऊ म्हणून देण्याचे ठरले असता तक्रारदाराने नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. त्यानुसार आज सोमवार (दि. १३) रोजी दुपारी तीन वाजता जुन्या तहसील कार्यालयातील तलाठी कार्यालयात नाशिक येथील पथकाने सापळा रचून तलाठी मासुळे यांना २००० रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. या कारवाई मध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपविभागीय अधिकारी नरेंद्र पवार, पोलीस हवालदार प्रकाश डोंगरे, पो.ना. प्रणय इंगळे सहभागी झाले होते.
दरम्यान, यापूर्वी देखील काही महिन्यांपूर्वी महसूल विभागातील तलाठी तसेच भुमी अभिलेख विभागाचे उपअधिक्षक विलास दाणी यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करीत अटक केली होती .

अजून बातम्या वाचा..

मनमाड शहर भाजप मंडलाच्या वतीने सलग 21व्या वर्षी अखंड भारत दिनी निमित्त व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या जन्म दिना निमित्त आयोजित रक्तदान शिबीरात 30 रक्तदात्यांचे रक्तार्पण

मनमाड शहर भाजप मंडलाच्या वतीने सलग 21व्या वर्षी अखंड भारत दिनी निमित्त व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या जन्म दिना निमित्त आयोजित रक्तदान शिबीरात 30 रक्तदात्यांचे रक्तार्पण

मनमाड - 79 व्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्ये ला 14 ऑगस्ट या अखंड भारत दिना निमित्ताने...

read more
व्यसनाधीन तरुण देशाच्या शाश्वत विकासासाठी धोक्याचे जागतिक युवा दिनानिमित्त मनमाड महाविद्यालयात, पोस्टर रांगोळी व पथनाट्य यांचे सादरीकरण

व्यसनाधीन तरुण देशाच्या शाश्वत विकासासाठी धोक्याचे जागतिक युवा दिनानिमित्त मनमाड महाविद्यालयात, पोस्टर रांगोळी व पथनाट्य यांचे सादरीकरण

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या रेड रिबन क्लब, राष्ट्रीय...

read more
श्रावण मास अंगारक (मंगळी ) संकष्ट चतुर्थी निमित्त मंगळवार दिनांक 12/08/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात विशेष धार्मिक कार्यक्रमा चे आयोजन

श्रावण मास अंगारक (मंगळी ) संकष्ट चतुर्थी निमित्त मंगळवार दिनांक 12/08/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात विशेष धार्मिक कार्यक्रमा चे आयोजन

मनमाड - शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील...

read more
भारतीय जनता पार्टी मनमाड शहर प्रणित भाजप कामगार आघाडीच्या शहर शाखेच्या फलकाचे उदघाटन

भारतीय जनता पार्टी मनमाड शहर प्रणित भाजप कामगार आघाडीच्या शहर शाखेच्या फलकाचे उदघाटन

मनमाड - भारतीय जनता पार्टी देश स्तरावर विविध क्षेत्रामध्ये काम करीत असते कामगार क्षेत्रामध्ये...

read more
.