मेष :- मनात नसत्या चिंता निर्माण होऊ शकतात. अति विचारात गुंतून जाऊ नका.
वृषभ :- मोठ्या लोकांच्या ओळखी होतील. स्वकष्टावर भर द्यावा. इच्छापूर्तीचा दिवस.
मिथुन :- व्यवसायात चांगला लाभ मिळेल. आज कामात फार कष्ट घ्यावे लागणार नाहीत.
कर्क :- सकारात्मक दृष्टीकोन बाळगावा. आपल्या आवडत्या कामावर लक्ष द्यावे.
सिंह :- एखादी चांगली संधी चालून येईल. परदेशी गुंतवणुकीतून लाभ संभवतो.
कन्या :- भागीदाराशी सलोखा वाढेल. जनसंपर्कात वाढ होईल.
तूळ :- अनोळखी व्यक्तींपासून सावध राहावे. कोणावरही चटकन विश्वास ठेऊ नका.
वृश्चिक :- मित्रांशी लावलेली पैज जिंकाल. कष्ट न करता पैसे कमावण्याकडे कल राहील.
धनू :- मानसिक समाधान लाभेल. मनातील चिंता दूर साराव्यात.
मकर :- मानसिक चंचलबिचल जाणवेल. कामात हार मानू नका.
कुंभ :- जमीनकीचे व्यवहार आज टाळावेत. फसवणुकीपासून सावधानता बाळगा.
मीन :- मुलांच्या हुशारीने हुरळून जाल. प्रकृतीत सुधारणा होईल.




