loader image
[ays_poll id=7]

ओ बी सी इम्परिकल डाटा सदोष पद्धतीने होत असल्याचा समता परिषदेचा आरोप

Jun 15, 2022

नांदगाव : ओबीसी एम्पीरिकल डाटा समर्पित आयोगा मार्फत सदोष पध्दतीने होत असल्याबाबत तहसिलदार नांदगाव यांना समता परिषदे कडून निवेदन देण्यात आले.
याबाबत वृत असे की सर्वोच्च न्यायलयाच्या आदेशाने महाराष्ट्रात मा. बाठीया यांच्या अध्यक्षते खाली समर्पित आयोग गठीत करण्यात आला असून सदर आयोगाने ओबीसी एम्पिरिकल डाटा घरोघर जावून ओबीसी ची खरी अर्थिक,सामाजीक,राजकीय स्थितीची माहीती संकलीत होणे अपेक्षीत आहे. पंरतू आमचे असे निर्दशनास आले आहे की आयोग वरील पद्वतीने माहीती संकलीत न करता सॉफ्टवेअर द्बारे आडनावा नुसार सदोष पद्वतीने डाटा संकलीत करीत आहे. ही समस्त ओबीसी समाजाची फसवणूक आहे. व यात ओबीसी समाजाचे कधीही भरून न येणारे नुकसान होणार आहे. म्हणून समर्पित आयोगाचे कामकाज त्वरीत थांबवून सदरचे काम तलाठी ‘ ग्रामसेवक ‘ आशा वर्कर ‘ अंगणवाडी सेवीका यांचे मार्फत संकलीत करून शासना मार्फत सर्वोच्च न्यायलयात सादर करण्यात यावा व ओबीसी समाजाला न्याय दयावा. अन्यथा समता परिषद राज्यभर तीव्र आंदोलन करेल व याची जबाबदारी सर्वश्वी आपली राहील. या पध्दतीचे निवेदन देण्यात आले. निवेदनावर समता परिषद शहराध्यक्ष शिवा सोनवणे, दीपक भाऊ खैरनार, अशोक पाटील, महेश पवार, शंकर शिंदे, दया जुन्नरे, सुरेश गायकवाड,नगरसेवक वाल्मिक टिळेकर,प्रतीक कोरडे, अरबाज शेख,सलमान पठाण, सागर शिंदे, सुरज कमोदकर, सचिन जेजुरकर, मोसिम शेख, सचिन सोमासे, सचिन देवकते, मुकुंद खैरनार, राहुल नाईक, भरत जाधव, राजूभाऊ लाठे गौतम जगताप, बाळासाहेब महाजन, सुधाकर निकम, चिंधा बागुल, बाळासाहेब महाजन, प्रशांत पाटील, राजूव बागुल, बाळासाहेब खैरनार आदीच्या सहया आहे.

अजून बातम्या वाचा..

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

मनमाड (प्रतिनिधी), ता. २० – त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील...

read more
मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

  मनमाड - शहरात गेली 29 वर्ष कार्यरत असलेली व मनमाड शहराची अर्थ वाहिनी असलेल्या प्रगती अर्बन...

read more
भुमी क्रिकेट अकॅडमीतील आर्या साळुंखे , स्वरांजली पवार व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला अंडर 15 संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील आर्या साळुंखे , स्वरांजली पवार व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला अंडर 15 संघात निवड

मनमाड - BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी (...

read more
सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड

सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड

मनमाड- महाराष्ट्र बास्केटबॉल असोसिएशन यांच्या मान्यतेने तसेच नाशिक डिस्ट्रिक्ट बास्केटबॉल असोसिएशन...

read more
.