loader image
[ays_poll id=7]

आमदार कांदे यांनी निवडणूक याचिका दाखल करावी : उच्च न्यायालयाचे निर्देश

Jun 16, 2022


नुकत्याच झालेल्या राज्यसभेच्या चुरशीच्या निवडणुकीत नांदगाव मतदार संघाचे शिवसेनेचे आमदार सुहास अण्णा कांदे यांचे मत अवैध ठरविण्यात आले होते. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान देत शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांनी उच्च न्यायालयात केलेल्या याचिकेवर केंद्रीय निवडणूक आयोगाने आक्षेप घेतला असून कांदे यांनी रिट याचिका दाखल केली आहे; मात्र त्यांनी निवडणूक याचिका दाखल करायला हवी, असे आयोगाच्यावतीने ॲड. अभिनव चंद्रचूड यांनी न्या. एस. व्ही. गंगापूरवाला व न्या. धीरज सिंह ठाकूर यांच्या खंडपीठाला सांगितले. त्यावर न्यायालयाने यासंदर्भातील युक्तिवाद २४ जूनला ऐकू, असे म्हणत याचिकेवरील सुनावणी तहकूब केली.

निवडणूक आयोगाने आपले मत अवैध असल्याचे जाहीर केल्याने आपल्या प्रतिष्ठेला मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोगाचा निकाल रद्द करावा, अशी मागणी कांदे यांनी याचिकेद्वारे केली आहे.


अजून बातम्या वाचा..

मनमाड शहर भाजपा मंडल तर्फे 79 व्या स्वातंत्र्य दिना निमित्ताने ध्वजारोहण कार्यक्रम व भव्य तिरंगा रॅली चेआयोजन युवकांचा उस्फुर्त प्रतिसाद

मनमाड शहर भाजपा मंडल तर्फे 79 व्या स्वातंत्र्य दिना निमित्ताने ध्वजारोहण कार्यक्रम व भव्य तिरंगा रॅली चेआयोजन युवकांचा उस्फुर्त प्रतिसाद

भारतीय जनता पार्टी मनमाड शहर मंडलाच्या वतीने स्वतंत्र हिंदुस्थान च्या 79 व्या स्वातंत्र्य दिना...

read more
मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारतीय स्वातंत्र्य दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारतीय स्वातंत्र्य दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारतीय स्वातंत्र्य दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला....

read more
.