loader image
[ays_poll id=7]

जैन समाजाच्या विविध प्रश्नांवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे दालनात बैठक संपन्न

Jun 16, 2022


जैन समाजाच्या विविध मागण्यांबाबतची बैठक राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना.अजितदादा पवार यांच्या मंत्रालयातील दालनात संपन्न झाली. यावेळी अल्पसंख्यांक विभागाचे मंत्री जितेंद्र आव्हाड उपस्थित होते.सदर बैठकीत विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली.
१. जैन समाजातील साधुसंत मुख्य रस्त्याने यात्रा करत असतात, त्यांना काही असामाजिक घटकांकडून त्रास दिला जातो.त्यांना सुरुक्षा पुरवण्यात यावी,असा आदेश काढून प्रत्येक जिल्हापातळीवरील पोलीस अधिकाऱ्यांना कळवण्यात येईल.

२. राज्यातील काही भागात जैन समाजाची लोकसंख्या कमी असल्याने निधी मिळत नाही,अशी तक्रार संघटनेतर्फे करण्यात आली.पुढील निधीवाटपात आपला निधी वाढवण्यात येईल अशी ग्वाही मंत्रीमंडळामार्फत देण्यात आली.

३. संपुर्ण राज्यातून पुण्यात विद्यार्थी शिक्षणासाठी येत असतात.अल्पसंख्याक समाजातील मुलींसाठी स्वतंत्र वसतीगृह शहरात अस्तित्वात आहे, त्याचप्रमाणे मुलांसाठीही वस्तीगृहाचे निर्माण करण्यात यावे,यावर लवकरच निर्णय घेण्यात येईल.

४. अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती देताना अल्पसंख्यांक समाजातील विविध घटकांना त्यांच्या लोकसंख्येनुसार शिष्यवृत्तीचे वाटप होते.यात प्रत्येक समाजाच्या मिळणाऱ्या शिष्यवृत्तीची टक्केवारी समान करावी अशी मागणी प्रतिनिधींमार्फत करण्यात आली. ही शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना ज्या त्या वेळी मिळत नाही या बाबी कडेही प्रतिनिधींनी लक्ष वेधले असता,याबाबत योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री पवार यांनी दिले.

५. म्हाडाच्या माध्यमातून अल्पसंख्यांक समाजातील ६ घटकांना आरक्षण देण्यात यावं,असा प्रस्ताव यावेळी प्रतिनिधींनी बैठकीत मांडला. राज्यातील अनेक भागात अल्पसंख्याक समाजातील काही नागरिकांना मालमत्ता घेण्यास परवानगी नाही.यावर अभ्यास करून योग्य तो निर्णय घेण्यात येईल.

६. राज्यातील पुरातन जैन मंदिराचे संवर्धन व्हावे,अशी भुमिका यावेळी प्रतिनिधी मंडळाने मांडली.तसा प्रस्ताव आल्यास नक्कीच यावर गांभीर्याने घेतल्या जाईल असा विश्वास मा. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिला.

७. कर्नाटक राज्यात जैन समाजाला लग्न समारंभासाठी सभागृह, समाज मंदिर, सामाजिक संस्थांसाठी निधी उपलब्ध करून देण्यात येतो, त्या धर्तीवर आपल्या राज्यातही ५० लाख ते १ कोटी बांधकामासाठी द्यावे, आणि त्या ट्रस्ट ला हस्तांतरित करण्यात याव्यात,अशी एक मागणी देखील होती.त्यासाठी शासन स्तरावर काही निकषांमध्ये बदल करावा लागणार आहे. त्यावर विचार केला जाईल.

८. अल्पसंख्यांक विभागामार्फत भव्य असे रुग्णालय उभारण्यात यावे.यासाठी शासनाकडून २५ एकर जमीन उपलब्ध करून द्यावी,अशी देखील मागणी करण्यात आली आहे.

९. ज्याप्रमाणे दक्षिण भारत जैन सभेचा दाखला कर्नाटक मध्ये विविध सबसिडी साठी ग्राह्य धरण्यात येतो, महाराष्ट्रातही तो व्हावा असा मुद्दा मांडण्यात आला. कर्नाटक सरकारकडून माहिती मागवून अभ्यास केला जाईल,अशी ग्वाही यावेळी दिली.

सदर बैठकीला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री ना.श्री.अजितदादा पवार, सहकारमंत्री ना.श्री.बाळासाहेब पाटील,राज्यमंत्री ना. श्री.राजेंद्र यड्रावकर,राज्यमंत्री ना.श्री.विश्वजित कदम, अल्पसंख्यांक विभागाच्या अप्पर मुख्य सचिव मा. जयश्री मुखर्जी, अल्पसंख्याक, सहकार, कृषी विभागातील सर्व प्रमुख अधिकारी यावेळी उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा यांच्यावतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा यांच्यावतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचारमंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा समन्वयक यांच्या संयुक्त विद्यमाने...

read more
जिल्हा परिषद निवडणूक मुदत वाढीसाठी राज्य निवडणुक आयोगाचा सर्वोच्च न्यायालयात अर्ज

जिल्हा परिषद निवडणूक मुदत वाढीसाठी राज्य निवडणुक आयोगाचा सर्वोच्च न्यायालयात अर्ज

स्थनिक स्वराज्य संस्था निवडणुकीची गुंतागुंत अधिकाधिक वाढत चालली असून आता राज्य निवडणूक आयोगाने...

read more
मनमाड पाठोपाठ नांदगाव भाजपा मध्ये नाराजीनाट्य, सानप, छाजेड यांच्यावर कारवाईची मागणी

मनमाड पाठोपाठ नांदगाव भाजपा मध्ये नाराजीनाट्य, सानप, छाजेड यांच्यावर कारवाईची मागणी

नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीत महाराष्ट्रात नंबर एक राहिलेल्या भारतीय जनता...

read more
.