Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

पत्रकारांवर हल्ला करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी : मालेगाव येथे पत्रकार शंकर वाघ यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध

Jun 17, 2022

मालेगाव येथील जेष्ठ पत्रकार, दैनिक दिव्यमराठीचे मालेगाव कार्यालय प्रमुख श्री शंकर वाघ यांच्यावर काल दुपारी 1 वाजेच्या सुमारास सटाणा रोड वरील दोन गटातील वादाचे वृत्तांकन करायला गेले हल्लेखोरांनी श्री वाघ यांना वार्तांकन करण्यापासून रोखत मोबाईल हिसकावून घेत मारहाण केली याबाबत मालेगाव येथे 15 ते 20 जणांच्या विरोधात मालेगाव येथे पत्रकार संरक्षण कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपींना कठोर शासन व्हावे यासाठी मनमाड शहर मराठी पत्रकार संघ व नांदगाव तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने या हल्ल्याचा जाहीर निषेध करण्यात आला. लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर अशा प्रकारे हल्ला करणे हा लोकशाहीची गळचेपी करण्याचा प्रकार आहे. आरोपींवर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशा आशयाचे निवेदन मा. मंडल अधिकारी तसेच मा. पोलिस निरीक्षक, मनमाड शहर पोलीस ठाणे यांना देण्यात आले. याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार अशोक परदेशी, नरेश गुजराथी, नरहरी उंबरे, अमोल खरे,निलेश वाघ,अशोक बिदरी,सतीश शेकदार, योगेश म्हस्के,अफरोज अत्तार, निलेश व्यवहारे, हुसैनी टिनवाला,तुषार गोयल, आनंद बोथरा आदी उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

नांदगाव सह येवला, मालेगावात उष्माघाताच्या लाटेची शक्यता; 112 प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये उष्माघात कक्ष

नांदगाव सह येवला, मालेगावात उष्माघाताच्या लाटेची शक्यता; 112 प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये उष्माघात कक्ष

मनमाड - मार्च महिन्यातच जिल्ह्यात तापमान ३३ ते ३५ अंशांवर पोचल्याने उष्णतेची लाट जाणवू लागली आहे....

read more
ओम मित्र मंडळ संचालित श्रीराम जन्मोत्सव समिती मनमाड 2024 – जाहीर बैठक                             

ओम मित्र मंडळ संचालित श्रीराम जन्मोत्सव समिती मनमाड 2024 – जाहीर बैठक                             

मनमाड - सालाबादप्रमाणे  1986 पासून सलग 38 व्या वर्षी यंदाही श्रीराम मंदिर आठवडे बाजार मनमाड येथे...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]