loader image
[ays_poll id=7]

दहावी बारावीत अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी पुरवणी परीक्षांच्या तारखा जाहीर

Jun 18, 2022


महाराष्ट्र बोर्डाकडून दहावी-बारावी परीक्षांचे निकाल जाहीर झाले आहेत. मात्र, काही विद्यार्थी या परीक्षेत अपयशी ठरलेत. त्यांच्यासाठी आता पुरवणी परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची अपडेट जाहीर करण्यात आली आहे. माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शालांत परीक्षेच्या अधिकृत संकेतस्थळावर याबाबत अधिक माहिती देण्यात आली आहे.

जुलै- ऑगस्ट 2022 मध्ये राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोकण, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर या नऊ विभागीय मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावी परीक्षेची लेखी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

पुरवणी परीक्षांचं वेळापत्रक जाहीर
दहावी बारावीच्या पुरवणी परीक्षांचं वेळापत्रक जाहीर झाल आहे. 27 जुलै ते 12 ऑगस्ट या दरम्यान दहावीची तर 21 जुलै ते 12 ऑगस्टदरम्यान बारावीची पुरवणी परीक्षा होणार आहे. दहावी बारावीत अनुत्तीर्ण झालेल्यांची ही परीक्षा आहे.

परीक्षांचे सविस्तर वेळापत्रक मंडळाची अधिकृत वेबसाइट www.mahahsscboard.in वर जाहीर करण्यात आले आहे. परीक्षेपूर्वी माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांत छापील स्वरूपात अंतिम वेळापत्रक मिळणार आहे. त्या छापील वेळापत्रकावरून परीक्षेच्या तारखांची खात्री करुन घ्यावी आणि परीक्षेस बसावे असे आवाहन मंडळाकडून करण्यात आले आहे.


अजून बातम्या वाचा..

शिक्षक दिनानिमित्त गुडविल गर्ल्स इंग्लिश मेडीयम स्कूल, मनमाड तर्फे उत्कृष्ट मुख्याध्यापक,शिक्षक,शिक्षकेतर पुरस्कार वितरण सोहळा  संपन्न.

शिक्षक दिनानिमित्त गुडविल गर्ल्स इंग्लिश मेडीयम स्कूल, मनमाड तर्फे उत्कृष्ट मुख्याध्यापक,शिक्षक,शिक्षकेतर पुरस्कार वितरण सोहळा संपन्न.

मनमाड :- योगीराज बहुउद्देशीय संस्था संचलित,गुडविल गर्ल्स इंग्लिश मेडीयम स्कूल,मनमाड तर्फे शिक्षक...

read more
लेदर बाॅल टी 20 स्पर्धेत मनमाड अंडर 14 संघाचा नांदगाव अंडर 14 संघावर विजय – अर्धशतकीय हसन शेख सामनावीर

लेदर बाॅल टी 20 स्पर्धेत मनमाड अंडर 14 संघाचा नांदगाव अंडर 14 संघावर विजय – अर्धशतकीय हसन शेख सामनावीर

  मनमाड - शनिवार 31 ऑगस्ट 2024, भुमी क्रिकेट अकॅडमी व श्री.गुरुगोबिंद सिंग हायस्कूल आयोजीत...

read more
साहिल जाधव ने पटकावले सुवर्णपदक जयराज परदेशी ला रौप्यपदक अनिरुद्ध अडसुळे ला कांस्यपदक

साहिल जाधव ने पटकावले सुवर्णपदक जयराज परदेशी ला रौप्यपदक अनिरुद्ध अडसुळे ला कांस्यपदक

छत्रपती संभाजी नगर येथे संपन्न झालेल्या राज्यस्तरीय युथ ज्युनियर सीनियर वेटलिफ्टिंग स्पर्धेत...

read more
.