Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

भाजपा मनमाड शहर मंडल तर्फेआठव्या विश्व योग दिन निमित्ताने योग अभ्यास कार्यक्रम संपन्न

Jun 21, 2022

भाजपा मनमाड शहर मंडलाच्या वतीने भारतीय संस्कृती चा गौरव दिन म्हणून संबोधले जाणाऱ्या आठव्या विश्व योग दिना निमित्ताने मंगळवार दिनांक 21 जून 2022 रोजी सकाळी ठीक 8 -30 वाजता श्री फिटनेस क्लब शेजारी लायन्स क्लब गार्डन ,आय. यु. डी. पी .मनमाड येथे कोरोना संकट चे सर्व नियमांचे पालन करून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले
भाजपा नासिक जिल्हा उपाध्यक्ष नितीन पांडे,भाजपा मनमाड शहर अध्यक्ष जयकुमार फुलवाणी, जिल्हा उपाध्यक्ष पंकज खताळ,भाजपा आर्थिक सेल नासिक जिल्हा अध्यक्ष कांतीलाल लुणावत, भाजपा महिला मोर्चा प्रख्यात योग शिक्षिका सौ.स्वाती प्रमोद मूळे,क्रिडा भारती चे मनमाड शहर अध्यक्ष आशीष घुगे ,आदी मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून मंचावर उपस्थित होते योग शिक्षिका सौ स्वाती मुळे व सर्व मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून योग अभ्यास कार्यक्रम चा शुभारंभ झाला योग शिक्षिका सौ स्वाती मुळे यांनी योग शास्त्र व योग दिनाचे महत्व सांगितले आणि योग शास्त्र तील 10 आसनांचा प्राथमिक अभ्यास प्रात्यक्षिक सह त्यांनी मार्गदर्शन करून उपस्थिततांन कडून करवून घेतले कुमारी किशोरी प्रमोद मुळे हिने मार्गदर्शक योग आसन प्रात्यक्षिक मंचावर सादर केली या योग अभ्यास कार्यक्रमास जेष्ठ नेते नीलकंठ त्रिभुवन, भाजप शहर सरचिटणीस एकनाथ बोडखे,नितीन अहिरराव, भाजपा अल्पसंख्याक मोर्चा शहराध्यक्ष जलील अन्सारी ,भाजपा दिव्यांग आघाडी चे शहराध्यक्ष दीपक पगारे,,भाजपा सचिव नारायण जगताप, भाजपा ओबीसी मोर्चा चे जिल्हा चिटणीस गौरव ढोले,ओबीसी आघाडी चे शहराध्यक्ष गोविंद सानप,भाजपा डॉक्टर आघाडी चे शहराध्यक्ष डॉ सागर कोल्हे,,भाजपा वकिल आघाडी चे शहर अध्यक्ष ऍड राजेंद्र पालवे, सौ खताळ, ट्रान्सपोर्ट आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष मुकेश पाटील,आदी प्रमुख सह नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते कार्यक्रमा चे नियोजन भाजपा मनमाड शहर अध्यक्ष जयकुमार फुलवाणी,व श्री फिटनेस क्लब चे संचालक आशीष घुगे यांनी यांनी केले.

अजून बातम्या वाचा..

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज,मनमाड मध्ये किशोरवयीन विदयार्थ्यांनींना सुरक्षितेसाठी मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न.

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज,मनमाड मध्ये किशोरवयीन विदयार्थ्यांनींना सुरक्षितेसाठी मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न.

  मनमाड:-एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड मध्ये किशोरवयीन विदयार्थीनींच्या स्वयं...

read more
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजनेचे उत्कृष्ट महाविद्यालय व कार्यक्रम अधिकारी पुरस्कार मनमाड महाविद्यालयस जाहीर

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजनेचे उत्कृष्ट महाविद्यालय व कार्यक्रम अधिकारी पुरस्कार मनमाड महाविद्यालयस जाहीर

राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ. पवनसिंग परदेशी यांना विद्यापीठस्तरीय सर्वोत्कृष्ट...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]