Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

नांदगाव शिवसेना महिला आघाडीतर्फे आज जागतिक योग दिनानिमित्त योग दिवस साजरा करण्यात आला.

Jun 21, 2022



शिवसेना महिला आघाडीतर्फे नांदगाव शहरातील महिलांना या निमित्ताने योगाचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. दैनंदिन जीवनात विविध आजारांपासून पासून आपण स्वतःला दूर कसे ठेवू शकतो आणि यासाठी योगाचे महत्व काय ते योग्य प्रशिक्षकांनी उपस्थित मुलांना समजावून सांगितले.
सदर कार्यक्रम शिवनेरी शासकीय विश्राम गृहाच्या प्रणांगणात घेण्यात आला. शिवसेना महिला आघाडीच्या शहर प्रमुख सौ.रोहिणी मोरे यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. याप्रसंगी योग प्रशिक्षक सौ. पुनम आहेर यांनी उपस्थित महिलांना योगाचे महत्व सांगितले, तसेच योग प्रात्यक्षिके करवू न घेतली. योग प्रशिक्षक सौ संगीता सोना सौ अर्चना बोरसे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारती बोरसे यांनी केले तसेच आभार रोहिणी मोरे यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी मोठ्या संख्येने नांदगाव शहरातील महिला या कार्यक्रमास उपस्थित होत्या.

अजून बातम्या वाचा..

AAAA+Ls चे समन्वयाने सॕम-मॕम बालकांच्या वजनवाढीसाठी राष्ट्रीय पोषण पंधरवडा २०२२ मध्ये करणार विशेष प्रयत्न- मयुरी महिरे

AAAA+Ls चे समन्वयाने सॕम-मॕम बालकांच्या वजनवाढीसाठी राष्ट्रीय पोषण पंधरवडा २०२२ मध्ये करणार विशेष प्रयत्न- मयुरी महिरे

मुख्यसेविका एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प नागरी (नाशिक) २ च्या कार्यक्षेत्रात राष्ट्रीय...

read more
जागतिक बँकेच्या सहकार्याने महाराष्ट्र कौशल विकास प्रकल्प राबविणार – राजेश टोपे

जागतिक बँकेच्या सहकार्याने महाराष्ट्र कौशल विकास प्रकल्प राबविणार – राजेश टोपे

राज्यात कौशल्य वृद्धीसाठी आवश्यक असणाऱ्या पायाभूत सुविधांचा विकास तसेच उद्योजकता आणि नाविन्यतेच्या...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]