loader image
[ays_poll id=7]

नाशिक चे सराफ विजय बिरारी यांच्या मृत्यूप्रकरणी तेलंगणाच्या तीन पोलीस अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल

Jun 21, 2022

नाशिक शहरातील सराफ व्यावसायीक विजय बिरारी यांच्या मृत्यूप्रकरणी अखेर तेलंगणाच्या तीन पोलीस अधिकार्‍यांविरुध्द मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बाबत चे वृत्त असे की दिनांक २५ फेब्रुवारी २०२० मध्ये चोरीचे सोने विकत घेतल्याच्या संशयावरून तेलंगणा पोलिसांनी बिरारी यांना ताब्यात घेतले होते. त्यावेळेस शासकीय विश्रामगृहाच्या इमारतीवरून पडून ते मृत्यूमुखी पडले होते. त्यानंतर बिरारी यांच्या मृत्यूपूर्वी नेमके काय झाले, याचा शोध राज्य अन्वेषण विभागाकडून सुरू होता. अखेर या तपासात तेलंगणाच्या तीन पोलीस अधिकार्‍यांना दोषी ठरविण्यात आले आहे. याप्रकरणी तीन पोलीस अधिकार्‍यांवर मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात शमशाबाद पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक रुपानी रामुलू व्यंकटेश, शादनगरचे तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक सादाम कृष्णा व सीसीएस विभागचे पोलीस उपनिरीक्षक एम. डी. खाजाखान अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

चोरीच्या सोन्याच्या प्रकरणाचा सायबराबाद पोलिस तपास करत असतांना आरोपी संतोषकुमार शिंदे याने चोरीचे दागिने बिरारींना विकल्याची कबुली दिली. त्यानंतर तेलंगणा पोलिसांचे पथक नाशिकला आले. हे सर्वजण शासकीय विश्रामगृह येथे थांबले. त्यानंतर सर्व पोलीस पंचवटीतील विजय बिरारींच्या दुकानात कायदेशीर नोटीस किंवा न्यायालयाचे कोणतेही जप्तीचे आदेश नसताना आले. बिरारींसह दोघांना पोलिसांनी ताब्यात घेत न्यायालयात हजर न करता अटकेबाबत मार्गदर्शक तत्वांचे पालन केले नाही. त्यांच्याकडे अटक वॉरंट नव्हते. चोरीचे दागिने न दिल्यास हैद्राबादला घेऊन जावू, असे सांगत पोलिसांनी बिरारींवर दबाव टाकला. त्यातून बिरारी ताणतणावाखाली आले. त्यानंतर त्यांनी विश्रामगृहाच्या चौथ्या मजल्यावरुन उडी घेत आत्महत्या केली. ही बाब सुनीता बिरारी, अ‍ॅड. समीरखान इनामदार, चंदनकुमार चंडीचरणकुमार यांच्या जबाब व तपासातून निष्पन्न झाली. सीआयडीच्या तपासात या बाबी समोर आल्या. या तीन पोलीस अधिकार्‍यांनी योग्य तो पोलीस बंदोबस्त न देणे, जिविताची खबरदारी न घेणे, बिरारींवर दबाव टाकत आत्महत्येस प्रवृत्त केले. याप्रकरणी पोलीस उपअधीक्षक नम्रता देसाई यांनी मुंबई नाका पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध सरकारतर्फे गुन्हा दाखल केला आहे.

अजून बातम्या वाचा..

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त बालदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त बालदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला

मनमाड -येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या...

read more
कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस 14 नोव्हेंबर बालदिन निमित्त पूर्वसंध्येला मनमाड धर्मग्रामाला भेट दिली

कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस 14 नोव्हेंबर बालदिन निमित्त पूर्वसंध्येला मनमाड धर्मग्रामाला भेट दिली

आज दिनांक 13 नोव्हेंबर 2025 रोजी नाशिक कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र...

read more
कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाअंतर्गत इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनात सर्वोत्तम कामगिरी करीत राज्यस्तरावर निवड झालेली आहे. 

कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाअंतर्गत इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनात सर्वोत्तम कामगिरी करीत राज्यस्तरावर निवड झालेली आहे. 

दिनांक :12/11/2025   कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या...

read more
मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न झाली....

read more
नामनिर्देशनपत्रातील माहितीसोबत संकेतस्थळावर कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही शनिवारी (ता. १५) देखील नामनिर्देशनपत्र स्वीकारणार

नामनिर्देशनपत्रातील माहितीसोबत संकेतस्थळावर कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही शनिवारी (ता. १५) देखील नामनिर्देशनपत्र स्वीकारणार

  मुंबई, दि. १३ - नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकांकरिता संकेतस्थळावर फक्त...

read more
एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद जयंती उत्साहात साजरी

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद जयंती उत्साहात साजरी

  *मनमाड (दि. ११ नोव्हेंबर) - एच.ए.के.हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, मनमाड येथे भारताचे पहिले...

read more
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक आयोजित

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक आयोजित

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी...

read more
.