loader image
[ays_poll id=7]

मनमाड महावितरणचा सहाय्यक अभियंता वीस हजाराची लाच घेतांना एसीबी च्या जाळ्यात.

Jun 22, 2022


आज पुन्हा एकदा लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक यांच्या यशस्वी सापळ्यामुळे तक्रारदार पुरुष,वय- ३५ वर्ष, रा.मनमाड़, जि.नाशिक. यांच्या तक्रारीची दखल घेऊन महेंद्र श्रावण चव्हाण, वय- ३७ वर्ष, सहायक अभियंता, ( म. रा. वि. वि. मर्या. रा. नवकार रो हाउस नंबर ६, शरयू पार्क -२, जत्रा होटेल जवळ, अंबिका साड़ी सेंटर मागे, आडगाव, नाशिक, कुणाल दादा ठाकरे, वय- ३० वर्ष,
धंदा- खाज़गी कंत्राटदार, रा. शिक्षक कॅालनी, ता. मनमाड, नाशिक ( खाज़गी इसम ) , अंकुश मोठाभाऊ डुकळे, वय- २९ वर्ष, धंदा- खाज़गी कंत्राटदार, रा. मु. पो. झाडी, ता. मालेगांव, जिल्हा – नाशिक ( खाज़गी इसम ) यांच्यवर २०,०००/- रु. लाच मागून २०,०००/-रु. लाच स्वीकारल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की तक्रारदार यांचे घराचे छतावरील पाईपास ३३ के. वि. ची बंदस्थितिल विद्युत वाहक तारा अनधिकृतपणे बांधल्या होत्या त्या काढणेकामी तक्रारदार यांनी आलोसे यांच्या कार्यालयात अर्ज केला होता. आलोसे यांनी कायदेशिर बाबिंची पूर्तता न करता त्यांचे मर्जितिल खाज़गी कंत्राटदार नेमले. खाज़गी कंत्राटदार यांनी तक्रारदार यांचेकडे सदरकामी २०,०००/- रूपये पंचासमक्ष मागणी केली. व आलोसे यांनी सदरकामी पंचासमक्ष खाज़गी कंत्राटदार यांना प्रोत्साहन दिले.
सदर लाचेची रक्कम खाज़गी कंत्राटदार क्रमांक ०२ यांनी स्वतः पंचासमक्ष तक्रारदार यांचे दुकानात, मनमाड़ येथे स्वीकारली म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर यशस्वी सापळ्यात तपास अधिकारी म्हणून संदीप घुगे, पोलीस निरीक्षक, अँन्टी करप्शन ब्युरो, नाशिक यांनी तर सापळा व मदत पथकात पो.नि गायत्री जाधव, पो. हवा.बाविस्कार, पो. हवा. प्रफुल्ल माळी, पो.ना. प्रकाश महाजन, चापोना- परशुराम जाधव यांनी सुनिल कडासने , पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक,एन.एस.न्याहळदे, अप्पर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक,सतीश डी.भामरे, साो., वाचक पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली अथक परिश्रम घेतले.


अजून बातम्या वाचा..

मनमाड शहर भाजपा मंडल तर्फे 79 व्या स्वातंत्र्य दिना निमित्ताने ध्वजारोहण कार्यक्रम व भव्य तिरंगा रॅली चेआयोजन युवकांचा उस्फुर्त प्रतिसाद

मनमाड शहर भाजपा मंडल तर्फे 79 व्या स्वातंत्र्य दिना निमित्ताने ध्वजारोहण कार्यक्रम व भव्य तिरंगा रॅली चेआयोजन युवकांचा उस्फुर्त प्रतिसाद

भारतीय जनता पार्टी मनमाड शहर मंडलाच्या वतीने स्वतंत्र हिंदुस्थान च्या 79 व्या स्वातंत्र्य दिना...

read more
मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारतीय स्वातंत्र्य दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारतीय स्वातंत्र्य दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारतीय स्वातंत्र्य दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला....

read more
नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या शहर पातळीवरील शालेय देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेला भरघोस प्रतिसाद

नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या शहर पातळीवरील शालेय देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेला भरघोस प्रतिसाद

मनमाड -- नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात...

read more
फलक रेखाटन – श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा !

फलक रेखाटन – श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा !

फलक रेखाटन - श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा ! फलक रेखाटन...

read more
.