loader image
[ays_poll id=7]

(बघा व्हिडीओ)एशियन चॅम्पियन कुस्ती स्पर्धेत मनमाड च्या शुभम आचपळे याने पटकाविले सुवर्णपदक

Jun 23, 2022

कजाकिस्थान येथे सुरु असलेल्या एशियन चॅम्पीयन कुस्ती स्पर्धेत मनमाड येथील स्वातंत्र्यवीर सावरकर जिमखाना कुस्ती प्रशिक्षण केंद्राचा खेळाडू शुभम हरी अचपळे ह्या युवकाने ४८ किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकून भारताचा तिरंगा डौलाने फडकावला . त्याला माजी नगराध्यक्ष साईनाथभाऊ गिडगे यांचे मार्गदर्शन लाभले . त्याला कोच महादेव मेटकर , पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते,संतोष जगताप , यशवंत तुपे , अजय मोरे , महेश दारुंटे यांचे सहकार्य लाभले . सावरकर जिमखाना तर्फे त्यांचा विजयाचा आनंदोत्सव साजरा करण्यात आला . शुभम अचपळे हा चांदवड तालुक्यातील शिंगवे येथील एका शेतकरी कुटूंबातील कुस्तीपटू आहे . घरची परिस्थिती अतिशय प्रतिकुल असतांनाही त्यांचे वडील हरिभाऊ अचपळे व आई सौ . मंदाकिनी अचपळे यांनी शुभमला घरातून कुस्तीसाठी प्रोत्साहीत केले . शुभमचे गुरुवर्य साईनाथ गिडगे यांनी शुभमला व त्याच्या लहान भावाला वयाच्या ६ व्या वर्षी दत्तक घेतले . त्यानंतर शुभमने साईनाथ गिडगे यांच्या तालीमीत कुस्तीचे धडे गिरविले व आज त्याने कजाकिस्थान येथे ४८ किलो वजनी गटात सुवर्ण पदक पटकावून देशाचे व आपल्या मनमाड शहराचे नाव उंचावले आहे . शुभमच्या या घवघवीत यशाबद्दल वीर सावरकर नगर शिवसेना व मित्र मंडळातर्फे आनंदोत्सव साजरा करण्यात आला .

अजून बातम्या वाचा..

मनमाड महाविद्यालयात हिंदी दिवस उत्साहात साजरा… “हिंदी फक्त राष्ट्रभाषाच नव्हे तर विश्व भाषा” – श्री.राजेंद्र जगताप

मनमाड महाविद्यालयात हिंदी दिवस उत्साहात साजरा… “हिंदी फक्त राष्ट्रभाषाच नव्हे तर विश्व भाषा” – श्री.राजेंद्र जगताप

मनमाड: येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या पदव्युत्तर...

read more
भाद्रपद महागणेशोत्सव ➖2024 निमित्त रविवारी वेशीतील प्राचीन श्री निलमणी गणेश मंदीरात सलग 10 वर्षी छप्पन महाभोग (महानैवेद्य) व श्री सत्यविनायक महापूजा या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

भाद्रपद महागणेशोत्सव ➖2024 निमित्त रविवारी वेशीतील प्राचीन श्री निलमणी गणेश मंदीरात सलग 10 वर्षी छप्पन महाभोग (महानैवेद्य) व श्री सत्यविनायक महापूजा या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

मनमाड - आम्ही परंपरा पाळतो... आम्ही संस्कृती चे रक्षण करतो.... हे ब्रीद घेऊन मनमाड शहरात धार्मिक...

read more
मनमाड करांच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा तृप्ती पाराशर आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड

मनमाड करांच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा तृप्ती पाराशर आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड

सुवा फिजी येथे १४ ते २१ सप्टेंबर २०१४ रोजी होणाऱ्या कॉमनवेल्थ चँपियनशिप साठी महाराष्ट्रातील एकमेव...

read more
मनमाड शहर भाजपा तर्फे आरक्षण विरोधी राहुल गांधी व हिंदू विरोधी शरद पवार यांचे विरोधात जोरदार घोषणा बाजी करीत निषेध आंदोलन

मनमाड शहर भाजपा तर्फे आरक्षण विरोधी राहुल गांधी व हिंदू विरोधी शरद पवार यांचे विरोधात जोरदार घोषणा बाजी करीत निषेध आंदोलन

राहुल गांधी यांनी अमेरिकेतील एका मुलाखती दरम्यान काँग्रेस भारतात सत्तेत आल्यास आरक्षण काढून टाकू...

read more
कासलीवाल स्कूलमध्ये माता पालकांसाठी कुकिंग बॅटल (कुकिंग विदाऊट फ्लेम्स ) स्पर्धेचे आयोजन…..

कासलीवाल स्कूलमध्ये माता पालकांसाठी कुकिंग बॅटल (कुकिंग विदाऊट फ्लेम्स ) स्पर्धेचे आयोजन…..

नांदगांव : दि १३ मारुती जगधने दि.13 सप्टेंबर 2024 नांदगाव येथील जे. टी. कासलीवाल इंग्लिश मिडियम...

read more
लायन्स क्लब ऑफ मनमाड प्राइड व लायन्स क्लब ऑफ मनमाड सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने एच.ए. के. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज,मनमाड मध्ये कर्करोग (कॅन्सर) जनजागृती कार्यक्रम संपन्न.

लायन्स क्लब ऑफ मनमाड प्राइड व लायन्स क्लब ऑफ मनमाड सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने एच.ए. के. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज,मनमाड मध्ये कर्करोग (कॅन्सर) जनजागृती कार्यक्रम संपन्न.

  मनमाड :-लायन्स क्लब ऑफ मनमाड प्राइड,लायन्स क्लब ऑफ मनमाड सिटी व कॅन्सर सेंटर अमेरिका (CCA)...

read more
.