loader image
[ays_poll id=7]

तळवाडे येथील वीज पडून मुत्यू झालेले शेतकरी कै.शांताराम निकम यांच्या वारसाना आ.सुहास कांदे यांच्या पाठपुराव्याने चार लाख रुपये मदत

Jun 24, 2022

याबाबत अधीक वृत असे की जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या वादळ वाऱ्यासह पावसामध्ये मोठे नुकसान झाले होते यामध्ये वीज पडून नांदगाव तालुक्यातील तळवाडे येथील शेतकरी कै. शांताराम सखाहरी निकम वय वर्ष साठ यांचा मृत्यू झाला होता . तसेच त्यांचे दोन बैल मयत झाले होते.
आ. सुहास कांदे यांनी सदर घटनेचा शासनाकडे पाठपुरावा केल्यानंतर शासन निर्णयानुसार नैसर्गिक आपत्ती ग्रस्तांसाठी तातडीची मदत उपलब्ध करून देण्यात येत असते या नुसार सदर मयत यांच्या वारस श्रीमती मंगलाबाई शांताराम निकम (पत्नी) यांना आज दिनांक 24 जून रोजी तहसीलदार सिद्धार्थ मोरे यांच्या उपस्थितीत व सौ.अंजूमताई सुहास कांदे यांच्या हस्ते चार लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला.
याप्रसंगी नायब तहसीलदार चेतन कोनकर, अव्वल कारकून संतोष डुमरे,महसूल सहाय्यक धनराज बच्छाव, शिवसेना तालुकाप्रमुख किरण देवरे,प्रमोद भाबड, शहर प्रमुख सुनील जाधव, विद्या जगताप संगिता बागुल,रोहिणी मोरे, सागर हिरे,भाऊराव बागुल,संजय आहेर हे उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

मनमाड (प्रतिनिधी), ता. २० – त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील...

read more
मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

  मनमाड - शहरात गेली 29 वर्ष कार्यरत असलेली व मनमाड शहराची अर्थ वाहिनी असलेल्या प्रगती अर्बन...

read more
भुमी क्रिकेट अकॅडमीतील आर्या साळुंखे , स्वरांजली पवार व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला अंडर 15 संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील आर्या साळुंखे , स्वरांजली पवार व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला अंडर 15 संघात निवड

मनमाड - BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी (...

read more
सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड

सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड

मनमाड- महाराष्ट्र बास्केटबॉल असोसिएशन यांच्या मान्यतेने तसेच नाशिक डिस्ट्रिक्ट बास्केटबॉल असोसिएशन...

read more
.