loader image
[ays_poll id=7]

राशिभविष्य : २५ जून २०२२ !

Jun 25, 2022


मेष – कर्ज इच्छुक व्यक्तींनी जास्त प्रयत्न करावेत. कौटुंबिक समस्या आली तरी त्यातून मार्ग काढा.

वृषभ – वादविवाद संघर्ष टाळण्यासाठी दुसऱ्यांना काय सांगायचे आहे तेदेखील ऐकून घ्या. गरज नसलेल्या कोणत्याही विचारांना थारा देऊ नका.

मिथुन – विद्यार्थ्यांनी मनावर संयमाचा अंकुश ठेवावा. पालकांच्या मनास समाधान देण्याचे धोरण ठेवा. वेळच्यावेळी आणि शिस्तबद्ध अभ्यास केल्यास अभ्यासात त्याचा चांगला फायदा होईल.

कर्क – अवांतर गोष्टींकडे सध्या तरी लक्ष देऊन वेळ वाया दवडू नका. कोणतीही जबाबदारी घेण्याआधी नीट विचार करावा.

सिंह – स्वार्थ आणि मोठेपणा सोडला की आनंद घेता येतो आणि देताही येतो. सर्वांशी जमवून घेतल्यास परिस्थिती आटोक्यात राहील.

कन्या – ज्या गोष्टी आपण बदलू शकत नाही त्या स्विकारण्यास शिका. जीवनात त्याचा उपयोग होतो. तुमच्या संततीची विशेष काळजी घ्या.

तुळ – विद्यार्थी वर्गाला अधिक श्रम करावे लागतील. वैवाहिक जीवनात विचारांची पारदर्शकता राहिल्यास वाद कमी होतील.

वृश्चिक – सामाजिक ठिकाणी स्वत:चे मत प्रतिक्रिया एकदम व्यक्त करू नये त्याआधी जाणकारांशी वैचारिक सल्लामसलत करावी. आळसामुळे नुकसान होणार नाही याची दक्षता घ्या.

धनु – जर कुठल्याही कठीण परिस्थितीवर तुमचे चांगले नियंत्रण असेल, तर विष ओकणारे सुद्धा तुमचं काही बिघडवू शकत नाहीत.

मकर – आशावादी राहण्यासाठी स्वत:ला प्रवृत्त करा. त्यामुळे तुमचा आत्मविश्वास आणि परिवर्तनशीलता, लवचिकता वाढेल.

कुंभ – कोणतेही कार्य हातात घेतल्यावर ते पूर्ण केल्याशिवाय समाधान लाभणार नाही पण कार्यपद्धतीस उतावळेपणाचे ग्रहण लागणार नाही याची दक्षता घ्या.

मीन – आवश्यकतेपेक्षा जास्त बोलू नका. शांतता व संयमाचे धोरण स्वीकारणे श्रेयस्कर ठरेल. शांत डोक्याने प्रयत्न केलात तर घरात सुखसमाधान शांतता नांदू शकेल.


अजून बातम्या वाचा..

.