मेष –
घरगुती प्रश्न सोडवताना भावुकतेला अधिक महत्व देऊ नये. सकारात्मक दृष्टिकोन मानसिक त्रास कमी करणारा ठरेल. मोठे कार्य पेलण्याची तयारी ठेवा व कृतीही करा. वादविवाद
वृषभ –
कागदपत्रे नीट पाहुनच त्यावर सही करावी. आपल्या मनावर श्रेष्ठ व्यक्तींचा प्रभाव ठेवा.
मिथुन –
दिलेला शब्द पाळण्यास विसरू नका. सारासार विचार करून कृती करा. जमा व खर्च यांचा ताळमेळ ठेवल्यास बऱ्याच चिंता कमी होतील.
कर्क –
गोष्टी पूर्ण हातात येत नाहीत तोपर्यंत त्यासंदर्भात वाच्यता करणे टाळावे. प्रत्येक व्यक्तीशी मृदू आणि सौम्य वागण्याचा प्रयत्न करा.
सिंह –
मुलांच्या प्रगतीसाठी बचतीचे धोरण ठेवा. जिद्द ठेवल्यास यश मिळेल. प्रत्येक गोष्टींचा आस्वाद घेताना त्याचा अतिरेक होणार नाही याची काळजी घ्या.
कन्या –
वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवावे लागेल. आपल्या विचारात स्पष्टता असू द्या. कोणतेही काम अर्धवट सोडू नका. जनहितासाठी केलेल्या कामाचे कौतुक होईल.
तुळ –
अपरिचितांच्या बोलण्यावर कितपत विश्वास ठेवावा याचे भान ठेवा. शत्रुवरील विजय संयमाने स्वीकारा.
वृश्चिक –
कर्तव्य पालनात कसूर नको. मनावर कोणत्याही प्रकारचे दडपण घेऊ नका अशा वृत्तीने सुयश प्राप्त करू शकाल. यश मिळविण्यासाठी कोणतीही पळवाट घेणे टाळा.
धनु –
एखादयाची योग्य माहिती आणि एकमेकाला समजून घेतल्यानंतरच मैत्री करा. निरर्थक विचारांना आळा घातल्यास आपल्याबद्दल गैरसमज निर्माण होणार नाही.
मकर –
घरातील माणसांची मने सांभाळा. घरातील माणसांकडून जास्त अपेक्षा बाळगू नका. सहजीवन म्हणजे तडजोड हे लक्षात ठेवा. कौटुंबिक जबाबदाऱ्या थोडया प्रमाणात वाढतील. आपल्या अपेक्षांचे ओझे मुलांवर टाकू नका.
कुंभ –
भावनेपेक्षा कोणतेही काम जबाबदारीने पूर्ण करावे. नात्यातील प्रेमळ धागा जपा. आपल्या कामाचे योग्य नियोजन करा. आत्मविश्वास वाढवा व स्वत:च्या कर्तृत्वाला अधिक बळकटी आणा.
मीन
गैरमार्गाने जाणाऱ्या मुलांना वेळीच रोखण्याची जबाबदारी पालकांची आहे हे ध्यानात ठेवा. संततीच्या चुका त्यांच्या नजरेला आणून देणे आवश्यक ठरेल. इतरांच्या मनात प्रेरणेची ऊर्जा निर्माण करण्यात पुढाकार घ्या.




