loader image
[ays_poll id=7]

आता मंत्री उदय सामंत सुद्धा नॉट रीचेबल ; शिवसेनेला आणखी एक धक्का

Jun 26, 2022


एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी होणाऱ्या शिवसेना आमदारांची संख्या वाढतच चालली आहे. आता मंत्री उदय सामंत हे गुवाहाटीला रवाना झाल्याचे वृत्त येत असून आज सकाळपासून सामंत नॉट रिचेबल होते. त्यानंतर उदय सामंत सूरतमार्गे गुवाहाटीला रवाना झाल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे.

उदय सामंत यांच्या बंडानंतर शिंदे गटात सहभागी होणारे ते आठवे मंत्री आहेत. आतापर्यंत महाविकास आघाडी सरकारमधील एकनाथ शिंदे, दादा भुसे, अब्दुल सत्तार, संदीपान भुमरे, गुलाबराव पाटील, बच्चू कडू, शंभूराज देसाई यांच्यानंतर उदय सामंत हे आठवे मंत्री आहेत. सामंत यांच्या जाण्याने आता शिवसेनेत विधानसभेतून निवडून आलेले केवळ एकमेव आदित्य ठाकरे हे मंत्री शिल्लक राहिल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे शिवसेनेला जबर धक्का बसला आहे.
उदय सामंत एकनाथ शिंदे गटात सामील होण्यासाठी गेलेत की त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी गेलेत याबाबत अद्याप स्पष्टता नाही.


अजून बातम्या वाचा..

बुरुकुलवाडी सबस्टेशन जवळ अस्तगाव रोडवरील पांझन नदी पुलाजवळ सुरक्षा कठडे लावावेत – संजय दराडे

बुरुकुलवाडी सबस्टेशन जवळ अस्तगाव रोडवरील पांझन नदी पुलाजवळ सुरक्षा कठडे लावावेत – संजय दराडे

  मनमाड – स्थानिक नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या अस्तगाव...

read more
आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी आनंदी सांगळे प्रवीण व्यवहारे तृप्ती पाराशर यांची खेलो इंडिया यूथ गेम्स साठी निवड

आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी आनंदी सांगळे प्रवीण व्यवहारे तृप्ती पाराशर यांची खेलो इंडिया यूथ गेम्स साठी निवड

राजगिर बिहार येथे ११ ते १५ मे २०२५ दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या ७ व्या खेलो इंडिया यूथ गेम्स...

read more
.