loader image
[ays_poll id=7]

१० जुलै पासून धावणार (भुसावळ – पुणे )हुतात्मा एक्स्प्रेस

Jun 26, 2022


सव्वादोन वर्षापासून कोरोना मुळे बंद करण्यात आलेली ११०२५ अप आणि ११०२६ डाऊन पुणे-भुसावळ हुतात्मा एक्सप्रेस १० जुलैपासून सुरू करण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने जाहीर केली आहे. १० जुलैपासून दररोज हुतात्मा एक्स्प्रेस रात्री १२.३५ वाजता म्हणजेच पूर्वीच्याच वेळेनुसार ही गाडी पुण्याकडे निघेल. जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, मनमाड, नाशिक, इगतपुरी, कल्याण, पनवेल, लोणावळा, खंडाळा आणि पुणे असा या गाडीचा प्रवास असेल.
यामुळे भुसावळ विभाग तसेच नांदगाव, मनमाड ,नाशिक जिल्ह्यातील प्रवासी, चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
कोरोना पार्श्वभूमीवर मार्च २०२० पासून ही गाडी बंद होती. यानंतर बहुतांश गाड्या पूर्ववत सुरू झाल्या तरी अद्यापही ही गाडी सुरू न झाल्याने प्रवाशांमध्ये नाराजी होती. ही गाडी नाशिक, ईगतपुरी, कल्याण, पनवेल, लोणावळा, खंडाळामार्गे पुण्याला जाते. यामुळे भुसावळ विभाग आणि जिल्ह्यातील प्रवासी, चाकरमान्यांना कल्याण, पनवेलला जाण्यासाठी ही गाडी सोईस्कर होती. ही गाडी पुन्हा सुरू करण्याच्या रेल्वे प्रशासनाच्या निर्णयाचे प्रवाशांनी स्वागत केले आहे.


अजून बातम्या वाचा..

नांदगाव तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत सेंट झेवियर हायस्कूलच्या खेळाडूंचे घवघवीत यश

नांदगाव तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत सेंट झेवियर हायस्कूलच्या खेळाडूंचे घवघवीत यश

मनमाड:-क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक, व...

read more
आयशा गाजियानी मॅडम यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल एच.ए. के. हायस्कूल ज्यु.कॉलेज तर्फे सत्कार.

आयशा गाजियानी मॅडम यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल एच.ए. के. हायस्कूल ज्यु.कॉलेज तर्फे सत्कार.

  मनमाड :- रोटरी क्लब ऑफ मनमाड तर्फे एच.ए. के. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड च्या...

read more
.