loader image
[ays_poll id=7]

राशिभविष्य : २७ जून २०२२ !

Jun 27, 2022


मेष –
भूतकाळातील घटनांवर वर्तमानात विचार करून फारसा उपयोग नाही उलट तुमची मानसिक व शारीरिक ऊर्जा उगाच फुकट जाईल. आपल्या वरिष्ठांना गृहित धरू नका. कायदेविषयक प्रश्न सोडविताना मध्यस्थावर अवलंबून राहू नये. आपली कुवत पाहून मगच एखादी जबाबदारी स्विकारा. जोपर्यंत एखादी गोष्ट पूर्ण करण्याची खात्री नसेल तोपर्यंत कोणताही वायदा करू नका. घडलेल्या प्रसंगामुळे आत्मसंशोधन केल्यास पुढील नुकसान टाळू शकाल.

वृषभ –
आयुष्य जबरदस्त आहे, ते जबरदस्तीनं जगू नका. तर जबरदस्तपणे जगा. तुम्हाला चुकीचा मार्ग दाखविणाऱ्या व्यक्तीवर लक्ष ठेवा किंवा चुकीची माहिती देऊन तुम्हाला हानी पोहोचविण्याची शक्यता आहे. तुमची बाजू वरचढ ठरवायची असेल तर तुम्हाला अतिशय सुयोग्यरित्या मार्ग अवलंबावा लागेल. नीट नियोजन करून धनार्जनासोबत धनं संचय करा. मोठी गुंतवणूक करताना ती विचारपुर्वक करावयास हवी. स्वत:हून ठरवून घेतलेले शैक्षणिक उद्दिष्ट गाठण्यासाठी प्रयत्नशील राहा.

मिथुन –
शक्यतो आपण कोणालाही जामीन राहू नये. बेजबाबदार व बेफिकीरीने वाहन चालवू नये. गरज नसलेल्या कोणत्याही विचारांना थारा देऊ नका. संघर्षाला विनाकारण हवा देऊ नका. त्याऐवजी खेळीमेळीने प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करा. मातुल घराण्याबरोबर कोणतेही गैरसमज मनात ठेऊ नका, आलेल्या शंकेचे वेळेवर निरसन करणे गरजेचे आहे. मुलांकडे अधिक लक्ष देण्याची गरज असेल. सहयोगी बनून काळजीपूर्वक परिस्थिती हाताळा.

कर्क –
प्रकृतिकडे दुर्लक्ष करू नका. आक्रमकतेवर संयम ठेवावा लागेल. कौटुंबिक वादाला कारणीभुत होणारे विषय टाळणे गरजेचे आहे. कुटूंबातील वडिलधाऱ्या व्यक्तींचा मानसन्मान राखा. आर्थिक धोरण सुधारणेसाठी आपण आखलेल्या योजनांचा नियमित पाठपुरावा करा. नात्यात उधार उसनवार करणे टाळावयास हवे. नोकरीतील धरसोड वृत्ती सोडून द्या. नोकरीत कामचुकारपणा करू नका. व्यवसायाच्या क्षेत्रात वरिष्ठांशी मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्या. सर्वोत्कृष्टतेची अपेक्षा ठेवण्यासाठी स्वत:ला उत्तेजन दया.

सिंह –
आपल्या अचानक बदलणाऱ्या स्वभावावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. बुद्धी कौशल्याने आर्थिक प्राप्ती होईल. एकंदरीत खर्च झाला तरी तुमचा उत्कर्ष व भरभराट होईल. तुम्हाला इतरांकडून जशी वागणूक मिळणे अपेक्षित आहे त्याच पद्धतीने तुम्ही इतरांशी वागले पाहिजे. आपल्या शक्तीच्या बाहेर उलाढाल्या करू नका. सुखी आयुष्यासाठी, वेळेचा निव्वळ व्यय करणाऱ्या हट्टी स्वभावाचा त्याग करा. विद्यार्थ्यांना परिश्रमाशिवाय यश नाही. तुम्ही स्वत:हून ठरवून घेतलेले शैक्षणिक उद्दिष्ट गाठण्यासाठी प्रयत्नशील राहा.

कन्या –
तुमच्या क्रांतिकारक विचारांना कृतीत आणा. घाईगडबडीत कागदपत्रावर सही करून अडचणीत येऊ नका. थोर व अनुभवी व्यक्तींचा आदर करा. नातेवाईकांच्या मध्यस्थीने कोणतेही व्यवहार करू नका. अचानक घेतलेल्या निर्णयामुळे खर्च वाढणार नाही याची काळजी घ्यावी. नाती टिकवण्यासाठी बोलण्यावर वचक ठेवा, शक्यतो दुखवू नका. सहकारी व कुटूंबियांच्या सहकार्याशी अपेक्षा धरू नका. दुसऱ्यांच्या प्रगतीने उदास न होता स्वतःच्या ध्येयावर लक्ष द्या.

तुळ –
शारीरीक क्षमता आणि जीवनशक्ती चांगली असेल. मानसिकता सकारात्मक ठेवल्यास चिंता कमी होतील. नीट शिकायच तर न कंटाळता पुन्हा पुन्हा तीच गोष्ट केली पाहिजे. तुमच्याजवळील अतिरिक्त पैसा सुरक्षित स्थळी ठेवा त्यामुळे येणाऱ्या काळात तुम्हाला त्याचा लाभ होईल. राजकीय सामाजिक क्षेत्रातील तुमचा दबदबा वाढेल. तुमचा नावलौकिक वाढेल. थोर व्यक्तींचा अनादर होणार नाही याची काळजी घ्या. विरोधकांना नामोहरम करण्यात यश मिळेल.

वृश्चिक –
आपले सामाजिक आयुष्य दुर्लक्षित करू नका. आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून कुटूंबियासमवेत पार्टीसाठी जा त्यामुळे केवळ आपल्यावरील ताण कमी होणार नाही तर आपली द्विधावस्था देखील नाहिशी होईल. राग आल्यावर थोडं थांबलं आणि चूक झाल्यावर थोडं नमलं तर जगातल्या सर्व समस्या दूर होतात. नि:संकोच वृत्ती ठेवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. धंदा व्यवसायाच्या विस्तारांसाठी प्रयत्नशील राहा. सर्व व्यवहार मुत्सद्दीपणे पार पाडा.

धनु –
धंदा, व्यवसायात नोकरीत थोडी गोंधळाचीच परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. नोकरी-व्यवसायात चैतन्य आणा. आरोग्याच्या दृष्टीने व्यायामातील सातत्य ठेवणे आवश्यक ठरेल. विरोधकांचा विरोध मावळेल. व्यसनापासून चार हात दूर राहा. घरातील पाळीव प्राण्यांच्या आरोग्याची काळजी घ्या. उष्ण विकाराचा त्रास संभवतो. उसने पैसे देताना चार वेळेस विचार करावा. स्वतःच्या फायद्यासाठी चुकीचे मार्ग अवलंबू नका. विद्यार्थ्यांनी काहीतरी नविन शिकण्याचा प्रयत्न करावा.

मकर –
नियोजित कामाचे सुयोग्य नियोजन करून कामाची योग्य विभागणी करा त्यामुळे दिलेला शब्द पाळणे शक्य होईल. व्यवहारातील प्रत्येक निर्णय सावधपणे, दूरगामी परिणामांची शक्यता लक्षात घेऊन घ्यावा लागेल. विद्यार्थ्यांनी बाहेरील मोहजालापासून स्वत:ला अलिप्त ठेवून आपले सर्व लक्ष अभ्यासावर केंद्रित करावे. तणावातून मार्ग शोधावा लागेल. तुमच्या राशीच्या चांगल्या गुणांना ओळखा व परिस्थितीमुळे स्वत:चीच होणारी फसवणुक टाळण्याचा प्रयत्न करा. बोलण्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा.

कुंभ –
मोबाईल-संगणक व नेट अशा करमणुकींच्या साधनांपासून स्वत:ला थोडे दूर ठेवणे हितकारक आहे. घरात थोडे मानापमानाचे प्रसंग उद्भवतील तरी गृहसौख्य लाभेल मानसन्मानही मिळेल. कुटूंबातील वातावरण आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा. घराच्या सुशोभीकरण, नूतनीकरणासारख्या गोष्टीकडे लक्ष द्या. थोर व वयोवृद्ध व्यक्तींचा अपमान होऊ देऊ नका. काम योग्य वेळात पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. कोणालाही आश्वासन देऊ नका. चुका सुधारण्याची संधी माणसाने कधीही सोडू नये.

मीन –
स्थलांतराचे योग येतील पण उतावळेपणाने निर्णय घेऊ नका. संततीच्या अडचणीकडे लक्ष द्यावे लागेल. भावंडांना मदतीचा हात द्याल पण त्यांच्याकडून कसलीही अपेक्षा करू नका. आपल्या करारी स्वभावास जरा मुरड घाला. कामावर असलेली जबाबदारी स्विकारा. जबाबदारी निभावण्याची क्षमता आपल्यात पुरेपूर आहे. प्रथम आपल्या क्षमतेचा विचार करणे व मग आश्वासन देणे योग्य ठरेल. इतरांची अतिचिकित्सा करू नका. कोणावर अवलंबून राहणे टाळावे.


अजून बातम्या वाचा..

.