Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

(बघा व्हिडिओ)मनमाडच्या शिवसैनिकांची पक्षप्रमुख उद्घव ठाकरे यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी

Jun 27, 2022

राज्यात ठिकठिकाणी सद्य राजकीय परिस्थितीवर समर्थन आणि विरोध प्रदर्शन सुरू आहे. आज मनमाडमध्ये सुद्धा शिवसेनेच्या आजी माजी पदाधिकारी व लोकप्रतिनिधींनी बैठक घेऊन शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा निश्चय करत घोषणाबाजी केली.यावेळी शिवसैनिकांनी छत्रपती शिवाजी महाराज व डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ एकत्र येत जोरदार घोषणाबाजी केली. उध्दव ठाकरे आगे बढो हम तुम्हारे साथ है….शिवसेना अंगार बाकी सब भंगार है….कोण आला रे कोण आला शिवसेनेचा वाघ आला अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला. यावेळी पक्ष सोडून गेलेल्या बंडखोर आमदारांचा यावेळी निषेध करण्यात आला. आम्ही निष्ठावान शिवसैनिक आहोत.आमच्या निष्ठा शिवसेनेशी आहे. अशी भूमिका शिवसैनिकांनी व्यक्त केली. २९ जून रोजी निष्ठावान शिवसैनिकांतर्फे रॅली काढून शक्तीप्रदर्शन करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

अजून बातम्या वाचा..

नांदगाव तालुक्यात वादळ, वारा,आणी टपोऱ्या गारांनी शेती पिकांचे व वैरणच्या चाऱ्याचे प्रचंड नुकसान

नांदगाव तालुक्यात वादळ, वारा,आणी टपोऱ्या गारांनी शेती पिकांचे व वैरणच्या चाऱ्याचे प्रचंड नुकसान

नांदगाव : मारुती जगधने जेव्हा पडायचा तेव्हा नाही आला आता प्रचंड नासाडी करुन होते नव्हते ते चिंब...

read more
अल्पवयीन मुलींचे लग्न – सासु, सासरे,पती, आई ,वडील आरोपी च्या पिंजऱ्यात – नांदगाव तालुक्यातील घटना

अल्पवयीन मुलींचे लग्न – सासु, सासरे,पती, आई ,वडील आरोपी च्या पिंजऱ्यात – नांदगाव तालुक्यातील घटना

नांदगाव : मारुती जगधने लग्नाचे वय झाले नसताना सुद्धा अल्पवयीन मुलींचे लग्न लाऊन दिले त्यांना मुले...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]