loader image
[ays_poll id=7]

झी २४ तास वृत्तवाहिनीचे प्रतिनिधी पत्रकार निलेश वाघ यांना कर्मयोगी पुरस्कार

Jul 1, 2022


मनमाड (प्रतिनिधी) : झी २४ तास वृत्तवाहिनीच्या नाशिक जिल्हा ग्रामीणचे प्रतिनिधी पत्रकार निलेश वाघ यांना कै. दादाजी राजाराम हिरे स्मृती कर्मयोगी पुरस्कार जाहीर झाला. या पुरस्काराची घोषणा रामराज्य ग्रुपचे संस्थापक श्री रामचंद्र हिरे यांनी आज केली आहे. येत्या २९ जुलै रोजी मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.

मालेगाव तालुक्यातील आघार बुद्रुक येथील कै. दादाजी राजाराम हिरे यांच्या प्रथम पुण्यस्मरण कार्यक्रमानिमित्त कर्मयोगी स्मृती पुरस्कार जाहीर करण्यात आला वृत्तवाहिनी वार्तांकन क्षेत्रात लक्षणीय कामगिरी करणाऱ्या पत्रकाराला हा पुरस्कार देण्यात येणार आहे. या पुरस्कारासाठी, पुरस्कार निवड समितीने झी २४ तास वृत्तवाहिनीसाठी नाशिक जिल्हा ग्रामीणचे प्रतिनिधी म्हणून काम पाहणारे पत्रकार निलेश वाघ यांना जाहीर केला. कै. दादाजी राजाराम हिरे यांचे निधन झाले असून त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव करण्यासाठी पत्रकाराला हा स्मृती पुरस्कार दिला जाणार आहे. कै. दादाजी राजाराम हिरे यांच्या प्रथम पुण्यस्मरणदिनी २ जुलै शनिवार रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान केला जाणार आहे. इतरांना मदत केल्या शिवाय आपण स्वतःला मदत करू शकत नाही, इतरांना समृध्द केल्या शिवाय आपलं आयुष्यात समृध्द होऊ शकत नाही, इतरांची भरभराट केल्याशिवाय आपली स्वतः ची भरभराट होत नाही.” हिच धारणा मनात ठेवून दुसऱ्याबद्दलची आपुलकी आपल्या शब्दां शब्दांतुन जाणवते व आपण आपल्या क्षेत्रात उल्लेखणीय कामगिरी करीत समाजाप्रती आपले कर्तव्य निस्वार्थपणे करीत आहात. आपले कार्य युवकांना, नवं पत्रकारांना प्रेरणादायी आहे. आपल्या कार्याची दखल घेत आपणांस कर्मयोगी पुरस्कारासाठी आपली निवड करण्यात आली असल्याचे रामराज्य ग्रुपचे संस्थापक श्री रामचंद्र हिरे कळविले आहे.


अजून बातम्या वाचा..

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज,मनमाड मध्ये स्वातंत्र्य दिन मोठया उत्साहात साजरा

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज,मनमाड मध्ये स्वातंत्र्य दिन मोठया उत्साहात साजरा

मनमाड : एच.ए.के.हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मध्ये संस्थेच्या सदस्य आयशा सलीम गाजीयानी यांच्या...

read more
अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल्सची स्वातंत्र्यदिना निमित्त नागरिकांसाठी विशेष आरोग्य पॅकेज

अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल्सची स्वातंत्र्यदिना निमित्त नागरिकांसाठी विशेष आरोग्य पॅकेज

अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल्सची स्वातंत्र्यदिना निमित्त नागरिकांसाठी विशेष आरोग्य पॅकेज नाशिक, १५...

read more
मनमाड शहर भाजपा चे रक्तदान क्षेत्रातील दोन दशकांचे अखंडित सेवा कार्य गौरवास्पद :शंकरराव वाघ

मनमाड शहर भाजपा चे रक्तदान क्षेत्रातील दोन दशकांचे अखंडित सेवा कार्य गौरवास्पद :शंकरराव वाघ

मनमाड - शहर भाजप मंडलाच्या वतीने सलग 20 व्या वर्षी अखंड भारत दिनी निमित्त आयोजित रक्तदान शिबीरात...

read more
फरहानदादा खान यांच्या वाढदिवसानिमित्ताने एच.ए. के. हायस्कूल &ज्यु. कॉलेज मधिल विदयार्थ्यांना राष्ट्रीय ध्वज वाटप.

फरहानदादा खान यांच्या वाढदिवसानिमित्ताने एच.ए. के. हायस्कूल &ज्यु. कॉलेज मधिल विदयार्थ्यांना राष्ट्रीय ध्वज वाटप.

  मनमाड:- आमदार मा.सुहास (आण्णा) कांदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना युवासेना...

read more
.