Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

नाशिक जिल्हा नियोजन समितीच्या ६०० कोटींच्या कामांना मुख्यमंत्र्यांनी लावला ब्रेक

Jul 2, 2022

राज्यात एकनाथ शिंदे गट आणि भाजपने मिळून नवीन सरकार स्थापनेनंतर सरकारने सगळ्यात पहिला धक्का शिवसेनेला देत कुलाबा-वांद्रे-सिप्झ या मेट्रो 3 चे कारशेड आरे कॉलनीमध्येच होणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले होते त्या पाठोपाठ आता एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसलाही मोठा धक्का दिला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता छगन भुजबळांना दणका दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जिल्हा नियोजन समितीच्या 600 कोटींच्या कामांना ब्रेक लावला आहे. घाईघाईत कामांना मंजुरी कशासाठी ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. एकनाथ शिंदेंनी नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांना यासंबंधी सवाल केला आहे. कार्यसमितीची बैठक घेऊन घाईघाईने 567 कोटींचं काम मंजूर करण्यात आलं होतं. या कामाला ब्रेक लावत एकनाथ शिंदे यांनी छगन भुजबळ यांना मोठा धक्का दिला आहे.

अजून बातम्या वाचा..

रेल्वे प्रशासनाने विविध प्रश्नांवर त्वरित तोडगा काढावा – शिवसेनेची रेल्वे महाप्रबंधकांकडे मागणी

आज रेल्वे महाप्रबंधक लाहोटी यांचा नांदगाव रेल्वे स्थानक येथे दौरा पार पडला. नांदगाव शिवसेनेच्या...

read more

पानेवाडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी गणवेश वाटप न झाल्याने पालक वर्गात संताप

पानेवाडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी मोफत देण्यात...

read more

लायन्स (रणरागिणी) क्लबचा कनाशी येथील मुलींचे वस्तीगृह येथे प्रजासत्ताक दिन साजरा

शबरीमाता वनवासी कल्याण आश्रम मुलींचे वस्तीगृह कनाशी येथे लायन्स क्लब आणि रणरागिणी क्लब यांनी भेट...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]