शबरीमाता वनवासी कल्याण आश्रम मुलींचे वस्तीगृह कनाशी येथे लायन्स क्लब आणि रणरागिणी क्लब यांनी भेट देऊन 73 वा प्रजासत्ताक दिन साजरा केला.
राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली , मनमाडचे शिक्षक सुनील नाईक (वनवासी कल्याण आश्रम जिल्हा कार्यकारिणी सदस्य) यांच्या संपर्कातुन श्री सुधीर पाटील आणि सौ साधना पाटील यांच्या पुढाकाराने लायन्स क्लब मनमाड (रणरागिणी) टीमने कनाशी येथील मुलींच्या वसतिगृहाला भेट देऊन त्यांच्या दैनंदिन उपयोगाच्या अन्नधान्यासह कपडे व मिठाई ची गोड भेट दिली व अडचणी च्या प्रसंगी आम्ही मनमाडकर कायम तुमच्या सोबत आहोत असे भरीव आश्वासन दिले. वनवासी कल्याण आश्रम मनमाड शाखेचे सचिव श्री शशिकांत भागवत यांनी वस्तीगृहाला त्यांच्या वतीने एक संगणक संच भेट म्हणुन दिला.
याप्रसंगी जनजाति कल्याण आश्रमाचे प्रांत कोषाध्यक्ष श्री धोपावकर तसेच प्रांत कार्यालयातील प्रमुख कार्यकर्ते श्री देशमुख ,जिल्हा संपर्क प्रमुख सोमनाथ पवार स्थानिक व्यवस्थापिका यशोदाबाई गावित यांच्यासह मनमाडचे अध्यक्ष प्रकाशनाना कुलकर्णी ,सचिव शशिकांत भागवत , सह सचिव हेमंत पेंडसे , कु. सायली पेंडसे आणि रा.स्व.संघाचे प्रांत प्रचार मंडळ सदस्य रमाकांत मंत्री हे देखील उपस्थित होते. वस्तु प्रदान कार्यक्रम प्रसंगी वसतिगृहातिल मुलींनी सर्वांचे स्वागतगीताने आणि स्वतः तयार केलेल्या पुष्पगुच्छानी स्वागत केले.
सौ. साधना पाटील यांनी येथे येण्याची प्रेरणा कशी मिळाली हे सांगून ही पहिलीच भेट आहे यापुढे आम्ही सतत संपर्कात राहु असे आश्वासन दिले ,सौ स्वाती गुजराथी यांनी वनवासी जीवनातील विदारक प्रसंग सांगून यांना आपण शहर निवासी लोकांनी कशी मदत, सहकार्य केले पाहीजे याविषयी मनोगत व्यक्त केले , रा स्व संघाचे रमाकांत मंत्री यांनी सामाजिक स्तरावर आपण एक आहोत ही भावना न रहाता तशी जाणीव सर्वांच्या मनात निर्माण व्हावी आणि सर्व समाज एका स्तरावर ताठ मानेने उभा रहावा यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे असे सांगून “तू मैं एक रक्त ” या घोषणेचे प्रकटीकरण होण्याची आवश्यकता प्रतिपादन केली . याप्रसंगी रणरागिणी क्लबच्या
सौ. शिल्पा बत्रा , सौ. वृषाली गटणे ,सौ.नितु आहिरराव , सौ. अर्चना घोडेक , सौ.रजनी सुळ , सौ.जयश्री कुभाउ , सौ. स्वाती गुजराती , सौ.वनिता वैध ,सौ. अलका शिंदे , सौ. काजल राय ,सौ. गायत्री चंद्रेश्वर जगताप , सौ. जयश्री सुर्वे छात्रावास प्रमुख सौ.येशोदा ताई गावित कार्यकर्ते श्री. देविदास देशमुख , श्री. निलेश पवार , सौ. जयश्री देशमुख आदी उपस्थित होते.
सूत्रसंचालन करताना सोमनाथ पवार यांनी याच मुलींमधून कविता राऊत सारख्या मूली घडतात व त्या घडवण्यासाठी आपण एकलव्य खेलकूद प्रकल्प आणि तशा प्रकारचे अनेक उपक्रम राबवतो अशी माहिती दिली. मनमाड अध्यक्ष प्रकाशनाना कुलकर्णी यांनी सर्वांचे आभार मानले.












