Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

लोकनेते व्यंकटराव हिरे यांच्या ४२ व्या पुण्यतिथीनिमित्त मनमाड महाविद्यालयात वृक्षारोपण

Jul 3, 2022

मनमाड येथील महात्मा गांधी विद्यामंदीर संचालित, कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात लोकनेते व्यंकटराव हिरे यांच्या ४२ व्या पुण्यतिथीनिमित्त प्रतिमा पूजन व वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ए. व्ही.पाटील यांनी लोकनेत्यांच्या कार्यावर प्रकाशझोत टाकले, महात्मा गांधी विद्यामंदिर शिक्षण संस्थेची लोकनेते व्यंकटराव हिरे यांनी नेत्र दीपक प्रगती केली. सहा महाविद्यालय अनेक माध्यमिक शाळा व गरीब मुलांसाठी वस्तीगृह काढून त्यांची ज्ञानगंगा सर्वसामान्यांपर्यंत पोचविली. सन १९६९ मध्ये मनमाड महाविद्यालयाची स्थापना लोक नेत्यांनीच केली असे आपल्या मनोगतून व्यक्त केले.
महाविद्यालयाचे राज्यशास्त्र विभागाचे प्रा.एन डी पगार यांनी आपल्या मनोगतातून लोकनेत्यांच्या जीवनावर प्रकाशझोत टाकला भाऊंनी निरपेक्षपणे आपले जीवन व्यतीत केले. राजकारणाचा साधन म्हणून वापर करून त्यांनी शिक्षण व समाजकारण साधले शिक्षणाने अज्ञानाचा अंधकार नष्ट करण्याचा प्रयत्न केला. त्याचप्रमाणे महाविद्यालयाच्या परिसरात प्राणवायू व सावली देणाऱ्या वृक्षांचे वृक्षारोपण राष्ट्रीय सेवा योजनाच्या माध्यमातून करण्यात आले. यावेळी कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या ज्योती पालवे (बोडखे), वोकेशनल विभागाचे उपप्राचार्य प्रशांत बच्छाव, कुलसचिव श्री समाधान केदारे महाविद्यालयातील प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
महाविद्यालयात या कार्यक्रमाचे संयोजन राष्ट्रीय सेवा योजना व जनसंपर्क विभाग यांनी केले.

अजून बातम्या वाचा..

राज्यातील सर्व नगर परिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी एक वार्ड ऐवजी 2 वार्ड एक प्रभाग पद्धत लागू करण्याचा राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय…मनमाडला आता राहणार दोन वार्डाचा एक प्रभाग..एक प्रभाग मधून दोन नगरसेवक जाणार निवडून

बिग ब्रेकिंगराज्यातील सर्व नगर परिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी एक वार्ड ऐवजी 2 वार्ड एक प्रभाग पद्धत...

read more
रोटरी महिला क्लब मनमाड तर्फे मनमाड रेल्वे स्टेशन येथे मुलांना खाऊ व फळे वाटप…..

श्री सिद्धीविनायक मंदिराचे अध्यक्ष (रिलायन्स )आदेश बांदेकर साहेब ह्यांच्या तर्फे नांदगाव पूरग्रस्थांना मदत

नांदगाव मतदार संघात अतिवृष्टीमुळे उध्वस्थ झालेले संसार आणि विस्कळीत झालेले जनजीवन पुन्हा पूर्वी...

read more

नांदगावला जिल्हाधिकाऱ्यांची भेट
पूरग्रस्त भागांची केली पाहणी
प्रस्ताव तत्काळ मंजुरीसाठी पाठविणार – मांढरे

नांदगाव शहरावर उद्भवलेल्या संकटाने अनेक नागरिकांना आपली घरे, दुकाने तसेच अनेकांचे संसार उध्वस्त...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]