मनमाड : केंद्र सरकारचा सुरू असलेल्या स्वच्छ्ता अभियान पंधरवडा ( १६/०९/२०२१ ते ३०/०९/२०२१ ) अंतर्गत मनमाड येथील रोटरी महिला क्लब च्या सदस्यांनी सहभाग नोंदवला . येथील सेंट झेवियर्स शाळेतील तब्बल ४० मुले मुली तसेच सहभागी शिक्षक यांनी सुदंर असे पथनाट्य सादर करून स्टेशन वरील उपस्थित प्रवासी व रेल्वे कर्मचारी यांचे समोर स्वच्छ्तेचे महत्व विषद केले . मनमाड रेल्वे स्टेशन वरील गार्डन येथे रोटरी महिला सदस्या यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले . कार्यक्रमाचे शेवटी उपस्थित सर्वांना, महिला रोटरी क्लब तर्फे चहा ,पाणी ,फळे व बिस्कीट वाटप करण्यात आले .
ह्या प्रसंगी रोटरी महिला अध्यक्षा सौ. आरती शर्मा , सौ. चित्र गुजराथी , सौ. पूर्णिमा माने , सौ. लीला सदगिर , सौ. रविंदर कौर कांत , सौ. निधी शर्मा उपस्थित होत्या. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व महिला सदस्य तसेच जी. एल. एस. ग्रुप मनमाड यांचे मोलाचे सहकार्य लाभले .












