Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

राहुल नार्वेकर यांची विधानसभेच्या अध्यक्ष पदी निवड

Jul 3, 2022

महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी अखेर राहुल नार्वेकर यांची निवड झाली आहे. भाजपकडून राहुल नार्वेकर तर महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे राजन साळवी मैदानात होते. या लढतीत नार्वेकर यांनी बाजी मारली. आता महाराष्ट्राच्या विधिमंडळात सासरे आणि जावयांचं ‘राज्य’ असणार आहे. कारण विधानसभा आणि विधानपरिषद या दोन सभागृहाच्या ‘चाव्या’ आता सासरे आणि जावयाच्या हाती आल्या आहेत. विधानसभेत जावई राहुल नार्वेकर तर विधानपरिषदेत त्यांचे सासरे रामराजे नाईक निंबाळकर हे सध्या विधान परिषदेचे सभापती आहेत.

नार्वेकर हे राज्याच्या आणि देशाच्या इतिहासातील सर्वात तरुण विधानसभा अध्यक्ष ठरले आहेत. ते राज्य विधानसभेचे 20 वे अध्यक्ष आहेत. आज झालेल्या विधानसभा अध्यक्षाच्या निवडणुकीत शिरगणती केल्यानंतर नार्वेकर यांना बहुमतापेक्षा जास्त 164 मतं मिळाली. तर राजन साळवी यांना 107 मतं मिळाली. समाजवादी पक्ष आणि एआयएमचे आमदार या मतदानात तटस्थ राहिले. एकूण तीन आमदार तटस्थ राहिले. अशा पद्धतीनं नार्वेकर मोठ्या मतांनी विजयी झाले. आता अध्यक्षांची भूमिका आता महत्वाची असणार आहे. कारण उद्या शिंदे-फडणवीस सरकारची बहुमत चाचणी देखील पार पडणार आहे.

अजून बातम्या वाचा..

कवयित्री विनया काकडे यांच्या कवितासंग्रहाचा प्रकाशन सोहळा मान्यवरांच्या हस्ते संपन्न

कवयित्री विनया काकडे यांच्या कवितासंग्रहाचा प्रकाशन सोहळा मान्यवरांच्या हस्ते संपन्न

मनमाड : (योगेश म्हस्के) मध्यमवर्गीय व एकत्र कुटुंबाशी समरस झालेल्या कवयित्री विनया काकडे यांच्या...

read more
आता वैद्यकीय अभ्यासक्रम होणार मराठी माध्यमातूनही – महाराष्ट्र सरकारचा निर्णय

आता वैद्यकीय अभ्यासक्रम होणार मराठी माध्यमातूनही – महाराष्ट्र सरकारचा निर्णय

मध्य प्रदेश सरकारने वैद्यकीय अभ्यासक्रम हिंदीतून उपलब्ध करून देण्याचा निर्णय घोषित केल्यानंतर आता...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]