loader image

बघा व्हिडिओ – आय यू डी पी परिसरातील तरुणांचा स्तुत्य उपक्रम

Oct 29, 2022


आय.यु.डि.पी. दर्शन फ्रेंड सर्कल मधील तरुणांनी उत्स्फूर्तपणे एक स्तुत्य ऊपक्रम राबविला. परिसरातील स्वच्छता करून अनेक स्वच्छतेचे, पर्यावरणाचे जनजागृतीपर संदेश देणारे फोमशीट बोर्ड तयार करून प्रत्येक घरांचे गेटवर लावण्यात आले. त्या बोर्डवर एक पाऊल स्वच्छतेकडे, कचरा घंटागाडीतच टाका, स्वच्छ शहर आनंदी शहर, पुढील पिढीसाठी चांगली देन, माझा परिसर स्वच्छ ठेवेन, स्वच्छ सुंदर परिसर आरोग्य नांदेल निरंतर, कचरा योग्य ठिकाणी ठेवा, पृथ्वी, पाणी, हवा ठेवा साफ नाहीतर पुढली पिढी नाही करणार माफ, असा संदेश देण्यात आला. प्रत्येक घराजवळ एक कुंडीमध्ये झाड लाऊन ते कुंडीतील झाडाची जोपासायला परिसरातील नागरिकांना दत्तक म्हणून देण्यात आले. या ऊपक्रमाचे कौतुक परिसरातील श्री. महाले परिवार, शिंपी परिवार, चव्हाण परिवार, साखरे परिवार व महाराष्ट्र नवनिर्माण सेना शहराध्यक्ष सचिन शिरुड या नागरिकांनी केले असून दर्शन फ्रेंड सर्कलच्या तरुणांना शुभेच्छा दिल्या आहेत. दर्शन फ्रेंड सर्कलचे सार्थक महाले, विशाल शिंपी, आकाश घुगे, अनिकेत चव्हाण, अक्षय सोनार, विकी आहिरे, मोहित घुगे, विपीन महाले, विनीत महाले, सिद्धेश महाले, दानिश कुरेशी या युवकांनी हा स्तुत्य ऊपक्रम राबविला.

 


अजून बातम्या वाचा..

अश्विन मास संकष्ट चतुर्थी निमित्त शुक्रवार दिनांक 10/020/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

अश्विन मास संकष्ट चतुर्थी निमित्त शुक्रवार दिनांक 10/020/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री...

read more
.