Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

राहुल नार्वेकर यांची विधानसभेच्या अध्यक्ष पदी निवड

Jul 3, 2022

महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी अखेर राहुल नार्वेकर यांची निवड झाली आहे. भाजपकडून राहुल नार्वेकर तर महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे राजन साळवी मैदानात होते. या लढतीत नार्वेकर यांनी बाजी मारली. आता महाराष्ट्राच्या विधिमंडळात सासरे आणि जावयांचं ‘राज्य’ असणार आहे. कारण विधानसभा आणि विधानपरिषद या दोन सभागृहाच्या ‘चाव्या’ आता सासरे आणि जावयाच्या हाती आल्या आहेत. विधानसभेत जावई राहुल नार्वेकर तर विधानपरिषदेत त्यांचे सासरे रामराजे नाईक निंबाळकर हे सध्या विधान परिषदेचे सभापती आहेत.

नार्वेकर हे राज्याच्या आणि देशाच्या इतिहासातील सर्वात तरुण विधानसभा अध्यक्ष ठरले आहेत. ते राज्य विधानसभेचे 20 वे अध्यक्ष आहेत. आज झालेल्या विधानसभा अध्यक्षाच्या निवडणुकीत शिरगणती केल्यानंतर नार्वेकर यांना बहुमतापेक्षा जास्त 164 मतं मिळाली. तर राजन साळवी यांना 107 मतं मिळाली. समाजवादी पक्ष आणि एआयएमचे आमदार या मतदानात तटस्थ राहिले. एकूण तीन आमदार तटस्थ राहिले. अशा पद्धतीनं नार्वेकर मोठ्या मतांनी विजयी झाले. आता अध्यक्षांची भूमिका आता महत्वाची असणार आहे. कारण उद्या शिंदे-फडणवीस सरकारची बहुमत चाचणी देखील पार पडणार आहे.

अजून बातम्या वाचा..

नगरपरिषद कामगारांच्या मागण्यांकडे शासनाचे दुर्लक्ष; मनमाड ला काळीफित लावून कामबंद आंदोलन

नगरपरिषद कामगारांच्या मागण्यांकडे शासनाचे दुर्लक्ष; मनमाड ला काळीफित लावून कामबंद आंदोलन

महाराष्ट्र नगरपरिषद ,नगरपंचायत कर्मचारी,संवर्ग कर्मचारी संघटनेच्या वतीने नगरपरिषद कर्मचा-यांच्या...

read more
चांदवड तंत्रनिकेतनात शिक्षकांसाठी प्रशिक्षणसायबर सुरक्षा आणि सायबर फॉरेन्सिक इन कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी या विषयावर मार्गदर्शन.

चांदवड तंत्रनिकेतनात शिक्षकांसाठी प्रशिक्षण
सायबर सुरक्षा आणि सायबर फॉरेन्सिक इन कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी या विषयावर मार्गदर्शन.

श्री नेमिनाथ जैन ब्रह्रमचर्याश्रम संचालित श्री एच एच जे बी तंत्रनिकेतन अंतर्गत कॉम्प्युटर...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]