Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

चांदवड तंत्रनिकेतनात शिक्षकांसाठी प्रशिक्षण
सायबर सुरक्षा आणि सायबर फॉरेन्सिक इन कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी या विषयावर मार्गदर्शन.

Apr 5, 2022

श्री नेमिनाथ जैन ब्रह्रमचर्याश्रम संचालित श्री एच एच जे बी तंत्रनिकेतन अंतर्गत कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी विभागातर्फै दोन दिवसीय राज्यस्तरीय कर्मचारी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात संपूर्ण महाराष्ट्रातील तंत्रनिकेतना मधिल कॉम्प्युटर विभागातील शिक्षकांनी सहभाग घेतला. या प्रशिक्षणात तज्ञ व्याख्याते सौ. श्वेता जाधव, सायबर फॉरेन्सिक इन्व्हेस्टिगेटर ल्युमिव्हर्स सोल्युशन्स प्रा.ली. यांनी सायबर फॉरेन्सिक या विषयावर मार्गदर्शन केले, सौ. श्वेता जाधव यांनी सायबर फॉरेन्सिक या विषयाचे महत्त्व पटवून दिले त्यात त्यांनी झालेल्या सायबर अटॅकला कशा प्रकारे सामोरे जायचं हे सांगितले.आपला महत्वाच्या डेटा कशा प्रकारे सुरक्षित ठेवायचा हे सांगितले. आणि कु. किरण पेखळे, मुख्य कार्यकारी अधिकारी सायबस्की सायबर अॅम्बेसेडर सोल्यूशन्स प्रा. ली. यानी सायबर सुरक्षा या विषयावर मार्गदर्शन केले, या कार्यक्रमाच्या माध्यमातून कु.किरण पेखळे यांनी सर्व कर्मचाऱ्यांना सायबर सुरक्षा या विषयाचे महत्त्व समजावून सांगितले. त्यात त्यांनी विविध प्रकारचे सायबर अटॅक सांगितले. तसेच ते कोणत्या पद्धतीने होऊ शकता हे सांगितले. या कार्यक्रमाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातील एकूण ११० प्राध्यापकांना लाभ मिळाला, तसेच सहभागी प्राध्यापकांना ई प्रमाणपत्र देवून सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी विभागातील प्राध्यापक. एम.बी.शिंदे, एस.एस.शिंदे, ए.एस.बाराहाते समवेत सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी कार्यक्रमासाठी सह्कार्य केले. तसेच विभागप्रमुख ए.एस.चोरडिया व प्राचार्य डॉ. व्ही. ए. वानखेडे. यांनी मार्गदर्शन केले. विश्वस्त समितीचे अध्यक्ष मा.श्री बेबीलालजी संचेती व विश्वस्त समितीचे उपाध्यक्ष मा. श्री दिनेशजी लोढा, मानद सचिव मा.श्री जवाहरलालजी आबड, प्रबंध समितीचे अध्यक्ष मा.श्री अजीतकुमारजी सुराणा, प्रबंध समितीचे उपाध्यक्ष आणि तंत्रनिकेतनाचे समन्वयक श्री अरविंदकुमारजी भन्साळी, सह मानद सचिव मा.श्री. झुंबरलालजी भंडारी व तंत्रनिकेतनाचे मुख्य समन्वयक तथा प्रबंध समिती सदस्य, श्री राजेऺद्रकुमारजी बंब यांनी या दोन दिवसीय राज्यस्तरीय कर्मचारी प्रशिक्षण कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल सर्वांचे अभिनंदन करुन समाधान व्यक्त केले.

अजून बातम्या वाचा..

महिलेच्या गळ्यातील पोत ओरबाडून चोरटे पसार; शहरातील महिलांमध्ये भीतीचे वातावरण

महिलेच्या गळ्यातील पोत ओरबाडून चोरटे पसार; शहरातील महिलांमध्ये भीतीचे वातावरण

मनमाड- शहरातील अत्यंत गजबजलेल्या विवेकानंद नगर दोन परिसरात राहणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]