loader image
[ays_poll id=7]

केंद्रीय मंत्री डॉ सौ भारती पवार यांनी शासकीय आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना धरले धारेवर

Jul 5, 2022

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्य मंत्री डॉ.भारती पवार यांचे उपस्थिती मध्ये मंगळवारी मनमाड शहरात शासकीय कामकाज आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीत अनेक जनतेच्या संवेदनशील प्रश्नांन संदर्भात केंद्रीय मंत्री डॉ भारती पवार यांनी उपस्थित अधिकारी वर्गाची चांगलीच झाडा झडती घेत त्यांना धारेवर धरले मनमाड च्या आरोग्य व्यवस्था संबंधित माहिती चा आढावा घेतला असताना ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात प्रसूती साठी आलेल्या महिलांना विनाकारण खाजगी हॉस्पिटलमध्ये पाठवले जाते यावरून मंत्री महोदयांनी तीव्र शब्दात नाराजी प्रगट केली व तातडीने लेखी अहवाल मागवला कोरोना संदर्भातील उपाययोजना च्या सूचना दिल्या आणि मनमाड सारख्या मोठ्या शहरात 108 ही रुग्णवाहिका सेवा 24 तास उपलब्ध करण्यासाठी च्या कडक सूचना आरोग्य अधिकाऱ्यांना दिल्या तहसील कार्यालयाकडून विध्यार्थी साठी च्या कागदपत्रा मध्ये होणाऱ्या दिरंगाई बद्दल आणि रेशनकार्ड संबंधित समस्या बाबतीत ही डॉ पवार यांनी कडक सूचना दिल्या मनमाड शहरातील महावितरण च्या लपंडाव बद्दल महावितरण च्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले या शिवाय केंद्र सरकार च्या सर्व योजनांचे सविस्तर माहिती फ़लक लावण्याच्या सूचना सर्व विभागाना केल्या या शिवाय मनमाड शहरातील वाहतूक कोंडी ,मनमाड नगरपालिका संबंधित समस्या, मनमाड रेल्वे संबंधित समस्या शेतकऱ्यांना च्या खत संदर्भात ही या बैठकीत डॉ भारती पवार यांनी सविस्तर आढावा घेतला या बैठकीत डॉ भारती पवार यांनी विचारलेल्या अनेक अभ्यास पूर्ण प्रश्नांन ची उत्तरे देतांना अधिकाऱ्यांची भांबेरी उडाली या महत्वपूर्ण बैठकीत भाजपा नासिक जिल्हा उपाध्यक्ष नितीन पांडे, भाजपा मनमाड शहर अध्यक्ष जयकुमार फुलवाणी जिल्हा उपाध्यक्ष पंकज खताळ ,संघटन सरचिटणीस नितिन परदेशी, धीरज भाबड यांनी जनतेच्या समस्या व तक्रारी मंत्री महोदयांच्या निदर्शनास आणून दिल्या या बैठकीत भाजपा आर्थिक सेल चे जिल्हा अध्यक्ष कांतीलाल लुणावत, भाजपा माथाडी कामगार सेल जिल्हा अध्यक्ष नारायण पवार ,डॉ उमेश काळे ,भाजपा व्यापारी आघाडी जिल्हा उपाध्यक्ष सचिन संघवी ,व्यापारी आघाडी जिल्हा सरचिटणीस सचिन लुणावत ,जेष्ठ नेते उमाकांत राय,भाजप अल्पसंख्याक मोर्चा शहराध्यक्ष जलील अन्सारी,शहर सरचिटणीस एकनाथ बोडखे, नितीन अहिरराव, भाजपा भटक्या विमुक्त आघाडी जिल्हा सरचिटणीस अकबर शहा भाजप दिव्यांगआघाडी चे शहर अध्यक्ष दीपक पगारे,शहर कोशाध्यक्ष आनंद काकडे, अनंता भामरे,नारायण जगताप, डॉक्टर आघाडी चे शहर अध्यक्ष डॉ सागर कोल्हे,राज परदेशी, अनुसूचित जाती मोर्चा चे शहराध्यक्ष आशिष चावरिया,शहर सचिव सुमेर मिसर ट्रास्पोर्ट आघाडी चे जिल्हा उपाध्यक्ष मुकेश पाटिल, ओबीसी आघाडी चे शहराध्यक्ष गोविंद सानप,नमो फाउंडेशन च्या अध्यक्ष वर्षा झालटे, ,विजय देशमुख, क्रिश फुलवाणी,सौ वैशाली वाणी आदी प्रमुख मान्यवरांन सह येवला विभागाचे प्रांत अधिकारी नांदगाव चे तहसीलदार मोरे,मनमाड नगरपालिकेचे मुख्यअधिकारी सचिन पटेल, मनमाड पोलीस स्थानकाचे प्रभारी निरीक्षक प्रल्हाद गीते,तालुका आरोग्य अधिकारी डॉ जगताप ,महावितरण चे विभाग मुख्य अभियंता तडवी सहाय्यक अभियंता शिंदे रेल्वे विभागाचे मुख्य एईएन विशाल सैय्यद ,पीडब्लूडी चे खैरनार या प्रमुख अधिकाऱ्यांन सह सर्व विभागाचे वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी या वेळी उपस्थित होते या बैठकीचे संयोजन भाजपा शहराध्यक्ष जयकुमार फुलवाणी यांनी केले या बैठकीत मनमाड शहरातील व ग्रामीण परिसरातील नागरिक व शेतकऱ्यांनी आपल्या विविध तक्रारी व समस्या मांडल्या या आढावा बैठकी मुळे सर्वच शासकीय यंत्रणा कामाला लागल्या मुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

अजून बातम्या वाचा..

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त बालदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त बालदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला

मनमाड -येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या...

read more
कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस 14 नोव्हेंबर बालदिन निमित्त पूर्वसंध्येला मनमाड धर्मग्रामाला भेट दिली

कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस 14 नोव्हेंबर बालदिन निमित्त पूर्वसंध्येला मनमाड धर्मग्रामाला भेट दिली

आज दिनांक 13 नोव्हेंबर 2025 रोजी नाशिक कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र...

read more
कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाअंतर्गत इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनात सर्वोत्तम कामगिरी करीत राज्यस्तरावर निवड झालेली आहे. 

कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाअंतर्गत इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनात सर्वोत्तम कामगिरी करीत राज्यस्तरावर निवड झालेली आहे. 

दिनांक :12/11/2025   कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या...

read more
मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न झाली....

read more
नामनिर्देशनपत्रातील माहितीसोबत संकेतस्थळावर कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही शनिवारी (ता. १५) देखील नामनिर्देशनपत्र स्वीकारणार

नामनिर्देशनपत्रातील माहितीसोबत संकेतस्थळावर कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही शनिवारी (ता. १५) देखील नामनिर्देशनपत्र स्वीकारणार

  मुंबई, दि. १३ - नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकांकरिता संकेतस्थळावर फक्त...

read more
एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद जयंती उत्साहात साजरी

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद जयंती उत्साहात साजरी

  *मनमाड (दि. ११ नोव्हेंबर) - एच.ए.के.हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, मनमाड येथे भारताचे पहिले...

read more
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक आयोजित

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक आयोजित

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी...

read more
.