Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

प्रगती बँक : सर्व १५ संचालकांची बिनविरोध निवड

Jul 7, 2022

मनमाड शहरातीलअग्रगण्य समजली जाणारी प्रगती बँकेची पंचवार्षिक निवडणूक येत्या १७ जुलै रोजी होणार होणार होती. संचालक मंडळाच्या १५ जागांसाठी ३५ जणांनी अर्ज दाखल केले होते.सर्वसाधारण १० जागांसाठी २३ अर्ज, त्यात दोन महिला राखीव जागांसाठी चार, अनुसूचित – जाती जमाती एक जागेसाठी दोन अर्ज दाखल करण्यात आले होते तर इतर मागासवर्ग एक जागेसाठी तीन उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते तर भटक्या विमुक्त एका जागेसाठी तीन अर्ज दाखल करण्यात आले होते.मात्र माघारीची मुदत २२ जून ते ६ जुलै पर्यंत होती मात्र त्या अगोदरच माघारी विद्यमान संचालक मंडळाच्या विरोधात अर्ज दाखल करणाऱ्या सर्व इच्छुक उमेदवारांनी नाट्यमयरित्या माघार घेतली होती. प्रगती बँकेतील ज्येष्ठ संचालक तसेच जैन समाजातील ज्येष्ठ सहकाऱ्यांच्या विनंतीला मान देत विरोधात अर्ज दाखल करणाऱ्या सर्व उमेदवारांनी त्यांच्या विनंतीला मान देत अर्ज माघारी घेतले. त्यामुळे सर्वसाधारण गटातून श्री.ललवाणी कल्याणचंद मानकचंद,श्री.सुराणा हिरालाल(पोपटभाऊ)सुरजकरण,श्री.संकलेचा सुभाष कुंदनमल, श्री शिंगी अशोक पुशमल, श्री.शिंगी नवीन पन्नालाल, श्री.बाफना मनोज सुरजमल,श्री.ललवाणी संदीप शिवचंद, श्री.कुलकर्णी संदीप लक्ष्मण, श्री.भंडारी सुनील गणेशमल, श्रीमती पुष्पा विनोद ललवाणी तर महिला राखीव गटातून राका पुष्पाबाई प्रकाश, लोढा पुष्पा विजय तसेच इतर राखीव गटातून ( इतर मागास वर्ग) श्री.वरखेडे पंढरीनाथ गोपाळराव, श्री.गवळी मनोज सखाराम (भटक्या विमुक्त) तसेच श्री. हादगे दत्तात्रय माधवराव ( अनुसूचित जाती जमाती) यांची बिनविरोध निवड होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याबाबतची निवडीची अधिकृत घोषणा काल ६ जुलै रोजी करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नांदगाव चे सहाय्यक निबंधक चंद्रकांत विघ्ने यांनी काम पाहिले.सर्व नवनिर्वाचित संचालकांचे ठिणगी तर्फे अभिनंदन!

अजून बातम्या वाचा..

भारतीय जनसंघ ते भारतीय जनता पार्टी  समर्पणाची ऐतिहासिक वाटचालनिष्ठावंत कार्यकर्त्यांच्या पवित्र देशभक्ती चा ऐतिहासिक प्रवास

भारतीय जनसंघ ते भारतीय जनता पार्टी  समर्पणाची ऐतिहासिक वाटचालनिष्ठावंत कार्यकर्त्यांच्या पवित्र देशभक्ती चा ऐतिहासिक प्रवास

संपूर्ण विश्वा तील सर्वात मोठा राजकीय पक्ष असणाऱ्या भाजपाचा आज  शनिवार दिनांक दिन 06 एप्रिल 2024...

read more
बघा व्हिडिओ-कॅशियर बँकेतुन रोकड घेऊन पळाला ,नांदगांव पोलिसानी २४ तासात पडकुन रक्कम ताब्यात घेतली .वरिष्टाकडुन पोलसांच्या कामाचे कौतुक

बघा व्हिडिओ-कॅशियर बँकेतुन रोकड घेऊन पळाला ,नांदगांव पोलिसानी २४ तासात पडकुन रक्कम ताब्यात घेतली .वरिष्टाकडुन पोलसांच्या कामाचे कौतुक

  नांदगांव :मारुती जगधने नांदगांव येथील लक्ष्मीनगर येथे कार्यरत असलेल्या क्रेडीट एक्सेस...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]