loader image
[ays_poll id=7]

येवल्यात संपत्तीच्या लोभापायी ड्रायव्हरनेच केली अफगाणी तरुणाची हत्या

Jul 7, 2022

येवला तालुक्यातील चिचोंडी एमआयडीसी परिसरात मंगळवारी रात्री एका अफगाणी तरुणाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. ख्वाजा सय्यद जब चिस्ती असे त्याचे नाव असून तो मुळचा अफगाणीस्थानचा रहिवासी होता. ही हत्या संपत्तीच्या वादातून झाल्याची माहिती नाशिकचे पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. याप्रकरणातील आरोपी अद्याप फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.यासंदर्भात माहिती देताना पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी सांगितले की, अफगाणी नागरिक सुफी ख्वाजा सय्यद जरीब चिश्ती यांचा खून झाल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा खून त्यांच्या ड्रायव्हरने केल्याचे निष्पन्न झाले आहे. प्रॉपर्टी आणि पैशावरून अहमद चिश्ती यांचा खून झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

निर्वासित असल्यामुळे ते मालमत्ता खरेदी करू शकत नव्हते. त्यामुळे संशयितांच्या नावाने गाडी आणि मालमत्ता खरेदी केल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे. या प्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी सुफी धर्मगुरु यांचा ड्राइव्हर आणि इतर तीन जण फरार असल्याची माहिती मिळाली आहे. पोलिसांचे पथक या फरार संशयितांचा शोध घेत असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.

अजून बातम्या वाचा..

नांदगाव शहर व चांडक प्लॉट भागाला जोडणाऱ्या नवीन पुलाचे लोकार्पण सौ. अंजुमताई सुहास कांदे यांच्या हस्ते संपन्न.

नांदगाव शहर व चांडक प्लॉट भागाला जोडणाऱ्या नवीन पुलाचे लोकार्पण सौ. अंजुमताई सुहास कांदे यांच्या हस्ते संपन्न.

  आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या माध्यमातून नांदगाव शहरातील चांडक प्लॉट भागातील व परिसरातील...

read more
व्ही. एन. नाईक हायस्कूल येथे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली

व्ही. एन. नाईक हायस्कूल येथे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली

मनमाड :. व्ही. एन. नाईक हायस्कूल येथे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली....

read more
महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री नामदार दादाजी भुसे व नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास अण्णा कांदे यांचा भव्य नागरी सत्कार नाशिक स्वामीनारायण बँक्वेट हॉल येथे संपन्न झाला.

महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री नामदार दादाजी भुसे व नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास अण्णा कांदे यांचा भव्य नागरी सत्कार नाशिक स्वामीनारायण बँक्वेट हॉल येथे संपन्न झाला.

याप्रसंगी मंचावर नाशिक जिल्ह्यातील शिवसेनेचे नेते पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते. नागरी सत्कार...

read more
.