Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

(बघा व्हिडीओ) नांदगाव व मनमाड नगरपालिका मराठी शाळांच्या शिक्षकांनी मानले आ. सुहास अण्णा कांदे यांचे आभार

Jul 8, 2022

नांदगाव ( सोमनाथ घोंगाणे ) : नांदगाव व मनमाड शहरातील मोडकळीस आलेल्या नगरपालिका शिक्षण मंडळाच्या मराठी शाळांच्या इमारतीच्या दुरुस्तीसाठी आ. सुहास कांदे यांच्या माध्यमातून नगर विकास खात्याकडून दहा कोटी रुपयांचा निधी गेल्या महिन्यात मंजूर करण्यात आला आहे. या निमित्ताने नांदगाव व मनमाड शहरातील सर्व नगरपालिका शिक्षण मंडळातील शाळेच्या शिक्षकांनी आज आमदार निवास नांदगाव येथे आ.सुहास कांदे तसेच सौ.अंजुम कांदे यांचे आभार मानले.
याप्रसंगी बोलताना आ. कांदे यांच्या पत्नी सौ.अंजुम कांदे भाऊक झाल्याचे दिसून आले, कोणत्याही विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनात काहीतरी कमी राहून गेले म्हणून शिकता आले नाही असे मी पाहू शकत नाही म्हणून शाळांना भेट दिल्यानंतर शाळांचा इमारतींचा कायापालट व्हावा, विद्यार्थ्यांना सर्व सुविधा मिळाव्या असा निश्चय केला होता.
काही महिन्यांपूर्वी सौ अंजुम कांदे यांनी नांदगाव व मनमाड नगरपालिका मराठी शाळांना भेट दिली असता शाळां इमारतींची दुरावस्था झालेली पाहिली आणि आ .कांदे यांना सदर माहिती दिली तसेच मराठी शाळांच्या इमारतींचा कायापालट होणे त्यांची नूतनीकरण होणे व विद्यार्थ्यांना सुसज्ज शाळा व सुविधा उपलब्ध करून देण्यासंदर्भात चर्चा केली त्यानंतर नगर विकास खात्याअंतर्गत आमदारांच्या पाठपुराव्याने शाळा इमारत दुरुस्ती व नूतनीकरणासाठी दहा कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे.
आज सदर सर्व मराठी शाळांच्या शिक्षकांनी एकत्र येत आमदार निवास येथे आमदारांची भेट घेतली.
याप्रसंगी शिक्षक राजेंद्र मोरे यांनी बोलताना आ . कांदे व सौ.अंजुम कांदे यांचे आभार मानताना आजपर्यंतच्या इतिहासात आम्ही पहिल्यांदा असे आमदार पाहिले ज्यांनी मराठी शाळांच्या व विद्यार्थ्यांच्या काळजीपोटी दहा कोटी रुपयांचा मोठा निधी उपलब्ध करून देऊन शाळांचा कायापालट करण्याचे स्वप्न पाहिले, सौ अंजूम ताई यांनी प्रत्यक्ष शाळांना भेट देत शाळांची परिस्थिती पाहून या विषयाला आमदारांकडे गळ घातली आणि आज लवकरच शाळा इमारतींची नूतनीकरणाचे काम सुरू होणार असल्याचा आनंद आम्हा सर्व शिक्षकांना होत असल्याचे मनोगत व्यक्त केले.


मनमाड येथील शिक्षक विकास तरटे यांनी आमदारांना उद्देशून विश्वास व्यक्त केला की आपण आमच्यासाठी आमच्या विद्यार्थ्यांसाठी खूप मोठे कार्य केले आहे आता आमची जबाबदारी आहे की आम्ही जिल्ह्यातच नाही तर राज्यात आपल्या शाळांचे नावलौकिक होईल असे कार्य करू.
आ . कांदे शिक्षकांशी बोलताना आपल्या समस्या सोडवणे हे माझे कर्तव्य आहे तसेच माझे शिक्षण ही मराठी शाळेतून झालेले आहे आणि मराठी शाळेतून शिक्षण झालेलेच पुढे जाऊन मोठ्या पदावर विराजमान झालेले अनेक उदाहरणे आहेत आणि म्हणूनच आपली शाळांची अवस्था सौ.अंजुम कांदे यांनी मला कळवताच मी त्वरित निधीसाठी प्रयत्न केले. याव्यतिरिक्तही आपल्या शाळेत कोणी गरीब विद्यार्थ्यास मदत अथवा इतर काही सुविधांची गरज पडल्यास आपण मला संकोच सांगा आम्ही स्वखर्चातून आपणास ती उपलब्ध करून देऊ असा शब्द त्यांनी दिला.


याप्रसंगी शिक्षक राजेंद्र मोरे विकास तरटे’ जाधव ‘साहेबराव घुगे ‘शेवाळे मॅडम यांनी मनोगत व्यक्त केले तर शिवसेना महिला आघाडी शहर प्रमुख रोहिणी मोरे, शिवसेना तालुकाप्रमुख किरण देवरे प्रमोद भाबड सागर हिरे अय्याज शेख मुन्ना भाऊ दरगुडे कपिल तेलोरे तसेच नांदगाव व मनमाड येथील नगरपालिका मराठी शाळांचे शिक्षक वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

बघा व्हिडिओ – मनमाड शहरात डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त भिमोत्सवाला सुरुवात

बघा व्हिडिओ – मनमाड शहरात डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त भिमोत्सवाला सुरुवात

मनमाड ता ८ :  भारतरत्न डॉ.बाबासाहेब यांच्या जयंतीनिमित्त मनमाड शहरात भीमोत्सवाला सुरवात झाली असून...

read more
फेलोशिपच्या मागणीसाठी धरणे आंदोलनाला ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लॉइज असोसिएशनचा पाठिंबा

फेलोशिपच्या मागणीसाठी धरणे आंदोलनाला ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लॉइज असोसिएशनचा पाठिंबा

बार्टीकडे अर्ज केलेले व सर्व पात्रता अटी पूर्त केलेले फेलोशिप साठी पात्र असलेले संशोधक विद्यार्थी...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]