नांदगाव : जम्मू काश्मीरमधील अमरनाथ गुहेजवळ शुक्रवारी सायंकाळी झालेल्या ढगफुटी मुळे बाबा अमरनाथ यात्रेला गेलेले नांदगावचे २०० भावीक सुखरूप असल्याचे माजी नगराध्यक्ष राजेश कवडे , महेंद्र घोंगाणे व विजय चोपडा यांनी दूरध्वनी वरून सांगितले.
नांदगावचे माजी नगराध्यक्ष राजेश कवडे हे गेल्या १५ वर्षापासून बाबा अमरनाथ यात्रेचे आयोजन करीत असतात. यंदाही २०० स्त्री / पुरूष भावीक त्यांच्या नेतृत्वाखाली यात्रेला गेलेले आहे. शुक्रवारी अमरनाथ येथे झालेल्या ढग फुटीचे वृत टी. व्ही. वरील बातमीत दिसताच नांदगाव वासीय काळजीत पडले होते. खराब हवामान व मोबाईलला रेंज नसल्याने शहरवासीय काळजीत होते. रात्री उशीरा राजेश कवडे ‘ महेद्र घोंगाणे ‘ संदीप जेजूरकर यांनी फोनद्वारे आम्ही सुखरूप असल्याचे नांदगावकरानां सांगितले. बालटान व पहेलगाम च्या वाटेवर एनङीआरएफ व आयटीबीपी च्या टीम तैनात असून हेल्फ लाईन सुद्वा जारी करण्यात आली आहे. खराब हवामान मुळे प्रशासनाने काही काळ यात्रा थांबविली आहे.
ज्येष्ठ नागरिक, महिला, दिव्यांग प्रवाशांना मोठा दिलासा
एसटी बसनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांना विविध प्रकारच्या तिकिटांमध्ये सवलती राज्य परिवहन महामंडळाकडून...











