loader image
[ays_poll id=7]

भुसावळ-पंढरपूर रेल्वेचे येवला रेल्वे स्टेशन येथे भाजपा कार्यकर्त्यांनी केले जंगी स्वागत..

Jul 10, 2022

येवला – ( प्रतिनिधी ) दिनांक नऊ जुलै शनिवार रोजी रेल्वे मंत्रालयाच्या वतीने आषाढी एकादशी निमित्ताने वारकऱ्यांसाठी भुसावळ ते पंढरपूर या विशेष रेल्वे गाडीचे नियोजन केले होते सदर विशेष रेल्वे ही येवला मार्गे पंढरपूर साठी जाणार होती मात्र या रेल्वेला येवला रेल्वे स्टेशनवर थांबा नाकारण्यात आला होता

ही बाब भाजपा युवा मोर्चा विद्यार्थी आघाडी चे जिल्हाअध्यक्ष तसेच रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य समीर समदडिया यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तात्काळ नाशिक जिल्ह्याचे माजी पालकमंत्री गिरीश महाजन तसेच केंद्रीय कल्याण व आरोग्य राज्यमंत्री भारतीताई पवार यांच्याशी संपर्क साधून येवला रेल्वे स्थानकावर वारकऱ्यांसाठी या गाडीला थांबा द्यावा अशी मागणी केली या मागणीची त्वरित दखल घेऊन रेल्वे मंत्रालयाने या विशेष रेल्वेला येवला स्थानकात पाच मिनिटांचा थांबा दिला
दरम्यान भुसावळ पंढरपूर ही विशेष रेल्वे येवला रेल्वे स्थानकात येताच येथील वारकऱ्यांनी व भाजप कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला
रेल्वेच्या दोन्ही चालकांचा फेटे बांधून सत्कार करण्यात आला तसेच रेल्वेत आलेल्या प्रवाशांसाठी पाणी पाऊच आणि नाश्त्याची व्यवस्था देखील करण्यात आली होती

रेल्वे स्थानकातील या स्वागत समारंभासाठी भाजप जिल्हा उपाध्यक्ष आनंद शिंदे, रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य समीर समदडिया, शहराध्यक्ष तरंग गुजराथी, ओबीसी मोर्चा चे सरचिटणीस राजू सिंग परदेशी, तालुका संघटन सरचिटणीस प्राध्यापक नानासाहेब लहरे, बुनकर आघाडीचे मनोज दिवटे, संतोष काटे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष योगेश सोनवणे, रितेश बुब भाजपा व्यापारी आघाडी चे शहराध्यक्ष हेमचंद्र समदडिया, सौरव घोडके. मुकेश भावसार. ओंकार घोडके. समीर शेख आदि पदाधिकारी उपस्थित होते

अजून बातम्या वाचा..

मनमाड शहर भाजप मंडलाच्या वतीने सलग 21व्या वर्षी अखंड भारत दिनी निमित्त व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या जन्म दिना निमित्त आयोजित रक्तदान शिबीरात 30 रक्तदात्यांचे रक्तार्पण

मनमाड शहर भाजप मंडलाच्या वतीने सलग 21व्या वर्षी अखंड भारत दिनी निमित्त व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या जन्म दिना निमित्त आयोजित रक्तदान शिबीरात 30 रक्तदात्यांचे रक्तार्पण

मनमाड - 79 व्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्ये ला 14 ऑगस्ट या अखंड भारत दिना निमित्ताने...

read more
व्यसनाधीन तरुण देशाच्या शाश्वत विकासासाठी धोक्याचे जागतिक युवा दिनानिमित्त मनमाड महाविद्यालयात, पोस्टर रांगोळी व पथनाट्य यांचे सादरीकरण

व्यसनाधीन तरुण देशाच्या शाश्वत विकासासाठी धोक्याचे जागतिक युवा दिनानिमित्त मनमाड महाविद्यालयात, पोस्टर रांगोळी व पथनाट्य यांचे सादरीकरण

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या रेड रिबन क्लब, राष्ट्रीय...

read more
श्रावण मास अंगारक (मंगळी ) संकष्ट चतुर्थी निमित्त मंगळवार दिनांक 12/08/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात विशेष धार्मिक कार्यक्रमा चे आयोजन

श्रावण मास अंगारक (मंगळी ) संकष्ट चतुर्थी निमित्त मंगळवार दिनांक 12/08/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात विशेष धार्मिक कार्यक्रमा चे आयोजन

मनमाड - शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील...

read more
भारतीय जनता पार्टी मनमाड शहर प्रणित भाजप कामगार आघाडीच्या शहर शाखेच्या फलकाचे उदघाटन

भारतीय जनता पार्टी मनमाड शहर प्रणित भाजप कामगार आघाडीच्या शहर शाखेच्या फलकाचे उदघाटन

मनमाड - भारतीय जनता पार्टी देश स्तरावर विविध क्षेत्रामध्ये काम करीत असते कामगार क्षेत्रामध्ये...

read more
.