loader image
[ays_poll id=7]

शिंदे गटाला सुप्रीम कोर्टाचा दिलासा;सुनावणी पूर्ण होईपर्यंत कारवाई न करण्याची सूचना

Jul 11, 2022


एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील राज्यातील सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे. आज सुप्रिम कोर्टामध्ये झालेल्या सुनावणीमध्ये १६ बंडखोर आमदारांवर सुनावणी पूर्ण होईपर्यंत कुठलीही कारवाई करू नये, असे आदेश सुप्रिम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना दिले आहेत. तसेच या प्रकरणाची सुनावणी करण्यासाठी घटनापीठाची नियुक्ती करण्यात येणार असून, त्यासाठी काही वेळ लागेल, असे सुप्रिम कोर्टाने स्पष्ट केले आहे.

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेतील आमदारांनी बंड करून राज्यातील महाविकास आघाडी सरकार पाडले होते. शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर विधानसभा उपाध्यक्षांकडे १६ आमदारांना अपात्र ठरवण्याबाबत अर्ज दिला होता. त्याविरोधात शिंदे गटाने सुप्रिम कोर्टात धाव घेतली होती तसेच भाजपाच्या पाठिंब्याने एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. मात्र या सर्व घडामोडींविरोधात शिवसेनेने सुप्रिम कोर्टात धाव घेतली होती. या प्रकरणातील सर्व याचिकांवर ११ जुलै रोजी सुनावणी करण्याचे सुप्रिम कोर्टाने निश्चित केले होते. त्यामुळे आज सुप्रिम कोर्टात काय सुनावणी होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.


अजून बातम्या वाचा..

फलक रेखाटन-उस्ताद झाकीर हुसैन यांना रंगीत खडू माध्यमातील फलक रेखाटणातून भावपूर्ण श्रद्धांजली

फलक रेखाटन-उस्ताद झाकीर हुसैन यांना रंगीत खडू माध्यमातील फलक रेखाटणातून भावपूर्ण श्रद्धांजली

जागतिक कीर्तीचे तबलावादक ,तालतज्ञ, पदमविभूषण, उस्ताद झाकीर हुसैन यांना रंगीत खडू माध्यमातील फलक...

read more
मार्गशीर्ष मास संकष्ट चतुर्थी निमित्त बुधवार दिनांक 18/12/2024 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मार्गशीर्ष मास संकष्ट चतुर्थी निमित्त बुधवार दिनांक 18/12/2024 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री...

read more
आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी यांची आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड

आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी यांची आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड

दोहा कतार येथे १८ ते २१ डिसेंबर दरम्यान होणाऱ्या आशियाई यूथ व जूनियर चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी...

read more
.