शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने नाशिक जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या असून दिंडोरी लोकसभा संपर्कप्रमुख पदी जयंत दिंडे, सहसंपर्क प्रमुख पदी अल्ताफ खान तसेच विधानसभा दिंडोरी, कळवण, बागलाण जिल्हाप्रमुख पदी सुनील पाटील तर मनमाड चे माजी नगराध्यक्ष गणेश धात्रक यांची विधानसभा नांदगाव,मालेगाव (बाह्य), मालेगाव (मध्य) जिल्हाप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आल्याचे शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे. तसेच विधानसभा निफाड,येवला,चांदवड जिल्हाप्रमुख पदी येवल्याचे युवानेते कुणाल दराडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सुट्टीचा आनंद बाजूला ठेवत ‘कमवा आणि शिका’चा अनोखा दीपोत्सव!
मनमाड - *प्रकृती स्कूलच्या* विद्यार्थ्यांनी मनमाड शहरात फुलवला स्वावलंबनाचा आणि उद्योजकतेचा...











