Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

गिरना नदी काठावरील नागरिकांना सुरक्षिततेचा इशारा

Jul 14, 2022


आज दिनांक १४/०७/२०२२ रोजी गिरना धरणात दुपार पर्यंत ८० टक्के जिवंत साठा होईल, वरून येणारा पुराचा येवा बघता व धरण सुरक्षिततेचा आढावा घेऊन आज दुपारनंतर गिरना धरणातून जास्तीचे पुराचे पाणी खाली गिरना नदीत सोडण्यात येणार आहे, तरी नदी काठावरील नागरिकांनी सावध रहावे, कोणतीही जीवित व वित्त हानी होणार नाही याची काळजी घ्यावी, पुराचा प्रवाह हा पाणलोट क्षेत्रातून येणाऱ्या येवा प्रमाणे कमी जास्त करण्यात येईल.साधारणतः धरणातून करण्यात येणारा विसर्ग हा सुरवातीला २०००० क्यूसेक इतका राहील व तदनंतर पाणलोट क्षेत्रातून येणाऱ्या येवानुसार विसर्ग १००००० क्यूसेक पर्यंत जाण्याची शक्यता आहे, तो येणाऱ्या येवानुसार वेळो वेळी कमी जास्त होऊ शकतो ,तरी सर्वांनी खबरदारी घ्यावी ही असे आवाहन कार्यकारी अभियंता, गिरना पाटबंधारे विभाग, जळगाव व जिल्हा प्रशासन जळगाव यांच्या वतीने करण्यात येत आहे.

अजून बातम्या वाचा..

त्यागमुर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मिलिंद सामाजिक व सांस्कृतिक मंडळ यांच्या वतीने कार्यक्रम आयोजित

त्यागमुर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मिलिंद सामाजिक व सांस्कृतिक मंडळ यांच्या वतीने कार्यक्रम आयोजित

त्यागमुर्ती माता रमाई आंबेडकर यांची 124वी जयंतीनिमित्त डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक मालेगाव नाका मनमाड...

read more
पंतप्रधान आवास योजनेच्या तुटपुंज्या अनुदानामुळे ग्रामीण भागात अनुदान वाढवून मिळावे – मागणी

पंतप्रधान आवास योजनेच्या तुटपुंज्या अनुदानामुळे ग्रामीण भागात अनुदान वाढवून मिळावे – मागणी

पंतप्रधान आवास योजनेच्या घरकुलांना शहरी भागामध्ये दोन लाख पन्नास हजार रुपये तर ग्रामीण भागामध्ये...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]