नांदगाव ( प्रतिनिधी ) भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त नाशिकच्या नांदगाव पोलीस ठाणे व युवा फाऊंडेशन या सामाजिक संस्थेच्या वतीने आज रक्तदान शिबिर घेण्यात आले.या रक्तदान शिबिरात ४६ रक्तदात्यांनी सहभाग घेत रक्तदान केले.सामान्य रुग्णालय, मालेगाव येथील सामान्य रुग्णालयाचे रक्त संक्रमण अधिकारी डॉ.अंकिता पवार यांनी रक्तदानाचे महत्व पटवून दिले.

रक्त संक्रमण अधिकारी डॉ.अंकिता पवार, रक्तपेढी तंत्रज्ञ अण्णासाहेब तमणार, प्रितम महाजन, परिचारक शुभम बच्छाव, धीरज बोळणीस, सहाय्यक निखिल जाधव आदींनी रक्तदानाची प्रक्रिया पूर्ण केली.सामान्य रुग्णालय, मालेगाव येथील रक्तपेढीत हे रक्त संकलन करण्यात आले..यावेळी पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक सूरवडकर, पोलीस उपनिरीक्षक मनोज वाघमारे, भूषण अहिरे, भारत कांदळकर, दत्ता सोनवणे, अनिल शेरेकर, राकेश चौधरी युवा फाऊंडेशन सामजिक संस्थेचे सुमित सोनवणे, संदीप जेजुरकर आदी यावेळी उपस्थित होते.. शिबिर यशस्वितेसाठी नांदगाव पोलीस ठाणे व युवा फाऊंडेशन या सामाजिक संस्थेने विशेष प्रयत्न केले








