नांदगाव( प्रतिनिधी) – नाशिक जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी शुक्रवारी नांदगाव दौरा केला. नांदगाव येथे तालुकास्तरीय आढावा बैठकीत ग्रामसेवक व सरपंच यांच्याशी संवाद साधताना मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी सांगितले की, कुठल्याही परिस्थितीत कोणत्याही गावाला दुषित पाण्याचा पुरवठा होता कामा नये, टीसीएल चा वापर योग्य प्रमाणात व नियमितपणे करावा, मुदतबाह्य टीसीएल चा वापर होणार नाही याची दक्षता घ्यावी, अशा सूचना दिल्या. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा फडोळ, गट विकास अधिकारी गणेश चौधरी उपस्थित होते.
एकही पात्र मतदार नोंदणीपासून वंचित राहू नये यासाठी विशेष शिबीर
देश सुरु असलेल्या SIR अंतर्गत प्रत्येक पात्र मतदाराचे नाव मतदार यादीत दाखल व्हावे यासाठी निवडणूक...











