नांदगाव( प्रतिनिधी) – नाशिक जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी शुक्रवारी नांदगाव दौरा केला. नांदगाव येथे तालुकास्तरीय आढावा बैठकीत ग्रामसेवक व सरपंच यांच्याशी संवाद साधताना मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी सांगितले की, कुठल्याही परिस्थितीत कोणत्याही गावाला दुषित पाण्याचा पुरवठा होता कामा नये, टीसीएल चा वापर योग्य प्रमाणात व नियमितपणे करावा, मुदतबाह्य टीसीएल चा वापर होणार नाही याची दक्षता घ्यावी, अशा सूचना दिल्या. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा फडोळ, गट विकास अधिकारी गणेश चौधरी उपस्थित होते.
के आर टी हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी
मनमाड - नभी चंद्र सूर्य तारे सारे मिळूनी जय घोष करती त्रिखंडात गाजत राही अशी शाहू महाराजांची...









