मनमाड येथील श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे माजी सचिव ,छत्रे हायस्कुलचे मार्गदर्शक व आधारस्तंभ पुरुषोत्तम धारवाडकर वय ८७ वर्ष यांचे वृद्धापकाळामुळे दुःखद निधन झाले. एक हाडाचा शिक्षक तसेच उत्तम संस्थाचालक म्हणून ते सुपरिचित होते. 1961 ते 1996 या काळात शिक्षक म्हणून ते कार्यरत होते. श्रीराम संस्थेत 1979 ते 2016 या काळात त्यांनी सचिव म्हणून काम पाहिले, त्या आधी काही वर्षे ते संचालक होते. छत्रे विद्यालयाच्या उभारणीत त्यांचा सिंहाचा वाटा होता. बालवाडी ते बारावी पर्यंत छत्रे विद्यालयात शिक्षण उपलब्ध करून देण्यात त्यांचे हिरीरीचे प्रयत्न होते. बालवाडी,प्राथमिक,माध्यमिक, कनिष्ठ महाविद्यालय असा छत्रे विद्यालयाचा विस्तार असून या जडणघडणीत धारवाडकर सरांचे मोलाचे योगदान होते. स्थानिक, राज्य तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर क्रीडा,कला ,गुणवत्ता क्षेत्रात छत्रे चे विद्यार्थी यश मिळत आहेत,या मागे धारवाडकर सरांची प्रेरणा असे. सरांच्या निधनाने श्रीराम संस्थेचा आधारवड हरवला आहे. श्रीराम एज्युकेशन सोसायटी ,छत्रे विद्यालय तसेच विविध सामाजिक ,राजकीय पक्ष ,संघटना यांच्या वतीने सरांना आदरांजली वाहण्यात आली. त्यांच्या मागे पत्नी ,दोन मुले, मुलगी,सुना, जावई,नातवंडे असा परिवार आहे.

सेंट झेवियर हायस्कूलच्या शिक्षकांचे तालुकास्तरीय स्पर्धेत सुयश
मनमाड महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद...