loader image
[ays_poll id=7]

गिरणा धरणाच्या ६ (सहा) दरवाज्यातून पाण्याचा विसर्ग सुरू

Jul 17, 2022


नांदगाव : नाशिक जिल्हातील सर्वात मोठे धरण व उत्तर महाराष्ट्रातील सर्वात जास्त साठवण क्षमता असलेले व  ओळखले जाणारे `गिरणा धरण’ हे ९२ % भरले असून धरणाचे ६ (सहा ) वक्रदरवाजे १ फुटाने उघडण्यात आले आहे.
नांदगाव, मालेगांव, चाळीसगाव या तालुक्यातील जनतेची तहान भागविणारे म्हणून या धरणाची ओळख निर्माण आहे.
चणकापूर, हरणबारी  धरणातून पाण्याचा विसर्ग  सुरु असल्यामुळे गिरणा धरण भरण्याच्या उंबरठ्यावर आहे. काल दुपारी १२ वाजता धरण ९२ टक्के भरले. यानंतर तात्काळ धरण सुरक्षितततेच्या दृष्टीने वरून येणारे जास्तीचे पुराचे पाणी गिरणा नदीत पात्रात सोडण्यात आले आहे.
गिरणा धरणाचे सहा वक्र दरवाजे एक फुटाने उघडण्यात आले आहेत. या दोन्ही दरवाजांमधून नदीपात्रात एकूण ७१२८ क्युसेक पाण्याचा विसर्ग सध्या नदीत होत आहे. धरणामध्ये येणाऱ्या पाण्याची आवक बघता पाण्याचा विसर्ग कमी जास्त करण्यात येईल असेही याप्रसंगी सांगण्यात आले. नदीकाठी असलेल्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.नदीकडे जाऊ नये, तसेच गुरेढोरे नदी जवळ नेऊ नये ,असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलेआहे.
उत्तर महाराष्ट्रातील सर्वात जास्त साठवण क्षमतेच्या गिरणा धरणाचे एकून ६ (सहा) दरवाजे १फुटा ने उघडण्यात आले, २१ हजार ५०० दक्षलक्ष साठवण क्षमता असणारे हे धरण आहे.
गिरणा धरणातून ७१२८ क्युसेस  पाण्याचा विसर्ग आता गिरणा नदीत सुरू झाला असून धरणाच्या आवकेत होणाऱ्या वाढीवरून पाण्याचा विसर्ग कमी जास्त करण्यात येणार असल्याचे अभियंता पाटील यांनी सांगितले. गिरणा नदीला पाणी सोडण्यात आल्याने नदीकाठच्या नागरिकांना सातर्कतेचे आदेश देण्यात आले. गिरणा धरणावरील थेट पाणीपुरवठा योजनेद्वारे मालेगाव, चाळीसगाव व नांदगाव शहरासह दहीवाळ तसेच २५ गावे जोडली गेली आहेत. याशिवाय जळगाव जिल्ह्यातील पाच तालुक्यांतील १५४ ग्रामपंचायती या पिण्याच्या पाण्यासाठी गिरणा नदीच्या पाण्यावर अवलंबून आहेत. या भागाची सिंचनाची व पिण्याच्या पाण्याची तहान भागविणाऱ्या गिरणाधरण म्हणून ओळखले जाते.
धरण परिसरात पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे


अजून बातम्या वाचा..

मनमाड शहर भाजपा मंडल तर्फे 79 व्या स्वातंत्र्य दिना निमित्ताने ध्वजारोहण कार्यक्रम व भव्य तिरंगा रॅली चेआयोजन युवकांचा उस्फुर्त प्रतिसाद

मनमाड शहर भाजपा मंडल तर्फे 79 व्या स्वातंत्र्य दिना निमित्ताने ध्वजारोहण कार्यक्रम व भव्य तिरंगा रॅली चेआयोजन युवकांचा उस्फुर्त प्रतिसाद

भारतीय जनता पार्टी मनमाड शहर मंडलाच्या वतीने स्वतंत्र हिंदुस्थान च्या 79 व्या स्वातंत्र्य दिना...

read more
मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारतीय स्वातंत्र्य दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारतीय स्वातंत्र्य दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारतीय स्वातंत्र्य दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला....

read more
नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या शहर पातळीवरील शालेय देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेला भरघोस प्रतिसाद

नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या शहर पातळीवरील शालेय देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेला भरघोस प्रतिसाद

मनमाड -- नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात...

read more
फलक रेखाटन – श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा !

फलक रेखाटन – श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा !

फलक रेखाटन - श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा ! फलक रेखाटन...

read more
.