loader image
[ays_poll id=7]

संत जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज यांचे पहिले शिष्य ह.भ.प. परमपूज्य जगन्नाथ बाबा कासार ह्यांचे निधन

Jul 18, 2022

नांदगाव : संत जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज यांचे पहिले शिष्य ह.भ.प. परमपूज्य जगन्नाथ बाबा कासार राहणार जातेगाव यांना रविवार दि. १८ जुलै रोजी वयाच्या ८३ व्या वर्षी दिंडोरी येथील क्षीरसागर हॉस्पिटल येथे उपचार सुरू असताना सायंकाळी पाच वाजता देहावसन झाले.

संत जनार्दन स्वामी यांचे सन १९६० च्या दशकात जातेगांव येथे आगमन झाल्या पासून नाशिक जिल्ह्यातील श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर नंतर दुसऱ्या क्रमांकाचे प्रभू श्रीराम यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या श्री पिनाकेश्वर महादेव मंदिराच्या जिर्णोद्धार करण्या पासून जगन्नाथ बाबा त्यांच्या सानिध्यात होते, संत जनार्दन स्वामी यांनी त्यावेळी स्थापन केलेल्या श्री पिनाकेश्वर देवस्थान ट्रस्ट चे जगन्नाथ बाबा विश्वस्त होते.
परमपूज्य जनार्दन स्वामी यांच्या प्रत्येक कार्यक्रमात जगन्नाथ बाबा यांनी स्वताला वाहून घेतले होते, ते प्रत्येक ठिकाणी हजर असत, त्यावेळी जगन्नाथ बाबा यांनी लग्न न करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु परमपूज्य जनार्दन स्वामी यांच्या प्रपंच करून परमार्थ करण्याच्या आदेशामुळे लग्न केले होते.
परंतू प्रपंचाच्या जास्त विळख्यात न पडता स्वांमीच्या सेवेत जवळपास ३५ ते ४० वर्ष राहिले, त्यांना खांदेश तसेच मध्य महाराष्ट्रात मानणारा मोठा भक्त परिवार होता.
१ जानेवारी १९३८ चा जन्म असलेले जगन्नाथ बाबा त्यांच्या तरुण वयात (मल्ल) पहेलवान होते, ते येथील विविध कार्यकारी सोसायटीचे बरेच वर्ष अध्यक्ष होते, स्थानिक सामाजिक व राजकीय क्षेत्रात त्यांचा दबदबा होता.
बाबांच्या पार्थिवाचे सोमवारी सकाळी आठ वाजेपासून गावातील प्रमुख मार्गावरून भजनाच्या दुमदूमत्या स्वरात भव्य मिरवणूक काढण्यात आली, यावेळी त्यांचा भक्त परिवार तसेच नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
त्यानंतर त्यांच्या शेतातील रहाते घराच्या बाजूस संत जनार्धन स्वामी यांचे उत्तराधिकारी महामंडलेश्वर श्री शांतिगीरीजी महाराज यांच्या वतीने परमपूज्य रामानंद स्वामी, सेवागिरीजी महाराज व पिनाकेश्वर देवस्थान येथील माळी बाबा यांनी मंत्राच्या जयघोषात समाधिस्थ केले.
या प्रसंगी जनार्दन स्वामी महाराज यांच्या ट्रष्टचे प्रशासकीय अधिकारी काकासाहेब गोरे त्याचप्रमाणे जय बाबाजी भक्त परिवारातील भक्तगण, बाबांचे आप्तेष्ट, परिसरातील सामाजिक राजकीय क्षेत्रातील मान्यवर आणि हजारो नागरिकांनी अंत्यदर्शनासाठी गर्दी केली होती. जगन्नाथ बाबा यांच्या पश्चात तीन मुले, तीन मुली, सुना, जावाई, नातवंडे असा परिवार आहे.

अजून बातम्या वाचा..

मनमाड महाविद्यालयात हिंदी दिवस उत्साहात साजरा… “हिंदी फक्त राष्ट्रभाषाच नव्हे तर विश्व भाषा” – श्री.राजेंद्र जगताप

मनमाड महाविद्यालयात हिंदी दिवस उत्साहात साजरा… “हिंदी फक्त राष्ट्रभाषाच नव्हे तर विश्व भाषा” – श्री.राजेंद्र जगताप

मनमाड: येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या पदव्युत्तर...

read more
भाद्रपद महागणेशोत्सव ➖2024 निमित्त रविवारी वेशीतील प्राचीन श्री निलमणी गणेश मंदीरात सलग 10 वर्षी छप्पन महाभोग (महानैवेद्य) व श्री सत्यविनायक महापूजा या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

भाद्रपद महागणेशोत्सव ➖2024 निमित्त रविवारी वेशीतील प्राचीन श्री निलमणी गणेश मंदीरात सलग 10 वर्षी छप्पन महाभोग (महानैवेद्य) व श्री सत्यविनायक महापूजा या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

मनमाड - आम्ही परंपरा पाळतो... आम्ही संस्कृती चे रक्षण करतो.... हे ब्रीद घेऊन मनमाड शहरात धार्मिक...

read more
मनमाड करांच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा तृप्ती पाराशर आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड

मनमाड करांच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा तृप्ती पाराशर आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड

सुवा फिजी येथे १४ ते २१ सप्टेंबर २०१४ रोजी होणाऱ्या कॉमनवेल्थ चँपियनशिप साठी महाराष्ट्रातील एकमेव...

read more
मनमाड शहर भाजपा तर्फे आरक्षण विरोधी राहुल गांधी व हिंदू विरोधी शरद पवार यांचे विरोधात जोरदार घोषणा बाजी करीत निषेध आंदोलन

मनमाड शहर भाजपा तर्फे आरक्षण विरोधी राहुल गांधी व हिंदू विरोधी शरद पवार यांचे विरोधात जोरदार घोषणा बाजी करीत निषेध आंदोलन

राहुल गांधी यांनी अमेरिकेतील एका मुलाखती दरम्यान काँग्रेस भारतात सत्तेत आल्यास आरक्षण काढून टाकू...

read more
कासलीवाल स्कूलमध्ये माता पालकांसाठी कुकिंग बॅटल (कुकिंग विदाऊट फ्लेम्स ) स्पर्धेचे आयोजन…..

कासलीवाल स्कूलमध्ये माता पालकांसाठी कुकिंग बॅटल (कुकिंग विदाऊट फ्लेम्स ) स्पर्धेचे आयोजन…..

नांदगांव : दि १३ मारुती जगधने दि.13 सप्टेंबर 2024 नांदगाव येथील जे. टी. कासलीवाल इंग्लिश मिडियम...

read more
लायन्स क्लब ऑफ मनमाड प्राइड व लायन्स क्लब ऑफ मनमाड सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने एच.ए. के. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज,मनमाड मध्ये कर्करोग (कॅन्सर) जनजागृती कार्यक्रम संपन्न.

लायन्स क्लब ऑफ मनमाड प्राइड व लायन्स क्लब ऑफ मनमाड सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने एच.ए. के. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज,मनमाड मध्ये कर्करोग (कॅन्सर) जनजागृती कार्यक्रम संपन्न.

  मनमाड :-लायन्स क्लब ऑफ मनमाड प्राइड,लायन्स क्लब ऑफ मनमाड सिटी व कॅन्सर सेंटर अमेरिका (CCA)...

read more
.