loader image
[ays_poll id=7]

शिवसेनेत राष्ट्रीय पातळीवरची फूट ;शिवसेनेचे १२ खासदार शिंदे गटात ? उद्या घेणार पंतप्रधानांची भेट

Jul 18, 2022


शिवसेनेच्या आमदारांनी बंड केल्यानंतर आता खासदारही त्याच मार्गावर असल्याचं दिसत आहे. शिवसेनेची राष्ट्रीय पातळीवरची फूट उद्याच होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शिवसेनेचे 12 खासदार बंडाच्या तयारीत असून ते आमदारांप्रमाणेच वेगळा गट तयार करण्याची शक्यता आहे. लोकसभेत शिवसेनेचे नवे गटनेते म्हणून राहुल शेवाळे नेमले जाणार तर प्रतोदपदी भावना गवळी कायम राहणार असल्याचीही माहिती आहे.

विनायक राऊत, अरविंद सावंत ,राजन विचारे, गजानन कीर्तिकर, बंडु जाधव, ओमराजे निंबाळकर हे सहा खासदार तूर्तास मातोश्री एकनिष्ठ आहेत. उर्वरित 12 खासदार आता शिंदे गटामध्ये जाणार असल्याची माहिती आहे.

यासंबंधी लोकसभा अध्यक्षांना उद्या पत्र दिले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्ली दौऱ्यावर असून शिवसेनेच्या लोकसभेतील बारा खासदारांना घेऊन ते पंतप्रधानांची भेट घेण्याची शक्यता आहे.

खरी शिवसेना आमचीच असल्याचा दावा मजबूत करण्यासाठी एकनाथ शिंदे गट अधिक आक्रमक झाल्याचे चित्र आहे. त्यासाठी आता खासदारांपासून ते स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी, कार्यकर्ते यांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी शिंदे गट जोरदार प्रयत्न करत आहे. त्यासाठी शिंदे गटात सामिल होत असल्याचे जाहीर करताना अनेकजण शक्तीप्रदर्शन करत आहेत.


अजून बातम्या वाचा..

एक दिवशीय जिल्हास्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत महामानव फॉउंडेशन,मालेगाव संघ विजेता.

एक दिवशीय जिल्हास्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत महामानव फॉउंडेशन,मालेगाव संघ विजेता.

  मनमाड:-एम.एस.स्पोर्ट्स,मनमाड आयोजित भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रेल्वे क्रिडांगण,मनमाड...

read more
मनमाडमधील धाडसी घरफोडी करणारे तीन सराईत गुन्हेगार अटकेत, १ कोटी ५ लाखांचा माल जप्त

मनमाडमधील धाडसी घरफोडी करणारे तीन सराईत गुन्हेगार अटकेत, १ कोटी ५ लाखांचा माल जप्त

मनमाड : मनमाड शहरातील डमरे कॉलनी परिसरातील व्यावसायिक मुर्तजा अब्दुल हुसेन रस्सीवाला यांच्या घरात...

read more
.