loader image
[ays_poll id=7]

केंद्र सरकारने राष्ट्रीय पातळीवर “हर घर संविधान” हा उपक्रम राबवावा : संविधान साक्षरता-संवर्धन अभियानाची राष्ट्रपती,प्रधानमंत्री यांचेकडे निवेदनाद्वारे मागणी

Jul 21, 2022


भारतीय स्वातंत्र्याची पंचाहत्तरी देशभर साजरी होत असताना ज्या भारतीय संविधानामुळे भारत हे संघराज्य राष्ट्र म्हणून उभे आहे,त्या भारतीय संविधानातील विचार मूल्य भारतीय नागरिकांचे हक्क अधिकार आणि कर्तव्य या संदर्भात लोक जागृती करण्याकरता " हर घर संविधान "हा उपक्रम देशभर राबवावा अशी मागणी भारतीय संविधान साक्षरता-संवर्धन अभियानचे प्रवर्तक तथा निमंत्रक शरद शेजवळ यांनी राष्ट्रपती,प्रधानमंत्री यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे. भारतीय संविधानाने भारतीय नागरिकांना व भारतातील सर्वच सजीव निर्जीव घटकाला स्वतःच्या अस्तित्वासाठी व संवर्धनासाठी तयार करण्यात आलेले कायदे कलम याबद्दल लोकांमध्ये जनजागृती व्हावी व संविधाना प्रति भारतीय नागरिकांची बांधिलकी अधिक दृढ व्हावी याकरता भारतीय नागरिकांच्या घरापर्यंत भारतीय संविधानाचा मूल्य विचार प्रचार प्रसार झाला पाहिजे. भारतीयांचा म्हणून धर्मग्रंथ असलेला भारतीय संविधान हा ग्रंथ व त्यातील कायदे,नियम संविधान उद्देशिका याचे चिंतन- मनन व अनुपालन होण्यासाठी भारतीयांमध्ये लोक जागृती करण्यासाठी *हर घर संविधान* हा उपक्रम तातडीने हाती घेऊन शाळा महाविद्यालय विद्यापीठे व सर्वच शासकीय निमशासकीय कार्यालय आस्थापना यामध्ये संविधान उद्देशिकेचे वाचन त्याचप्रमाणे प्रत्येक शासकीय निमशासकीय कार्यालयात दर्शनी भागात संविधान उद्देशिका लावण्यात याव्यात,शाळा महाविद्यालय व विद्यापीठात भारतीय संविधान हा स्वतंत्र विषय शिकविला जावा,ज्या भारतीय संविधानाने खंडप्राय देशात लोकशाही स्वातंत्र्य समता ज्ञान बंधुता धर्मनिरपेक्षता वैज्ञानिक दृष्टिकोन राष्ट्रीय एकता व एकात्मता या मूल्यांची मांडणी करून गेली ७५ वर्ष भारताला एक संघ ठेवले आहे त्या संविधानाचे अध्ययन-अध्यापन अनुपालन करणे हे हर एक नागरिकाचे कर्तव्य असून ज्या संविधानाने राज्यकर्त्यांना राष्ट्रसेवेची अतिउच्च अशी अधिकार पदे बहाल केली त्या संविधानाप्रती देशातील प्रत्येक नागरिका सोबतच राज्य,केंद्र शासन प्रशासनातील सर्व व्यक्ती यांनी अधिक बांधील आणि दृढ राहून लोकांमध्ये भारतीय संविधाना प्रति जाणीव जागृती करणे हे अधिक संयुक्तिक आहे, त्या दृष्टीने राज्यकर्त्यांचे कर्तव्य व नागरिकांचे हक्क अधिकार याबद्दल अधिक जागृती होण्यासाठी प्रत्येक व्यक्ती व कुटुंब यांच्यापर्यंत संविधानाच्या विषयी माहिती ज्ञान देण्यासाठी भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने हर घर तिरंगा च्या धरतीवर *हर घर संविधान* हा विचार उपक्रम घेऊन जावा अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली असल्याची माहिती शरद शेजवळ यांनी दिली आहे. महेंद्र गायकवाड,अमीन शेख,अक्षय गांगुर्डे, अभय लोखंडे,प्रशिल शेजवळ, प्रा.के एस.केवट,प्रा.नितीन केवट, एस एन वाघ,सुभाष वाघेरे,वनिता सरोदे,अतुल डांगळे,दीपक शिंदे, सागर पगारे,प्रा.विनोद पानसरे,अझर शहा.


अजून बातम्या वाचा..

शिक्षक दिनानिमित्त गुडविल गर्ल्स इंग्लिश मेडीयम स्कूल, मनमाड तर्फे उत्कृष्ट मुख्याध्यापक,शिक्षक,शिक्षकेतर पुरस्कार वितरण सोहळा  संपन्न.

शिक्षक दिनानिमित्त गुडविल गर्ल्स इंग्लिश मेडीयम स्कूल, मनमाड तर्फे उत्कृष्ट मुख्याध्यापक,शिक्षक,शिक्षकेतर पुरस्कार वितरण सोहळा संपन्न.

मनमाड :- योगीराज बहुउद्देशीय संस्था संचलित,गुडविल गर्ल्स इंग्लिश मेडीयम स्कूल,मनमाड तर्फे शिक्षक...

read more
लेदर बाॅल टी 20 स्पर्धेत मनमाड अंडर 14 संघाचा नांदगाव अंडर 14 संघावर विजय – अर्धशतकीय हसन शेख सामनावीर

लेदर बाॅल टी 20 स्पर्धेत मनमाड अंडर 14 संघाचा नांदगाव अंडर 14 संघावर विजय – अर्धशतकीय हसन शेख सामनावीर

  मनमाड - शनिवार 31 ऑगस्ट 2024, भुमी क्रिकेट अकॅडमी व श्री.गुरुगोबिंद सिंग हायस्कूल आयोजीत...

read more
साहिल जाधव ने पटकावले सुवर्णपदक जयराज परदेशी ला रौप्यपदक अनिरुद्ध अडसुळे ला कांस्यपदक

साहिल जाधव ने पटकावले सुवर्णपदक जयराज परदेशी ला रौप्यपदक अनिरुद्ध अडसुळे ला कांस्यपदक

छत्रपती संभाजी नगर येथे संपन्न झालेल्या राज्यस्तरीय युथ ज्युनियर सीनियर वेटलिफ्टिंग स्पर्धेत...

read more
.