loader image
[ays_poll id=7]

राष्ट्रपतीपदी एनडीएच्या द्रौपदी मुर्मू विजयी ; देशातील पहिल्या आदिवासी महिला होणार राष्ट्रपती.

Jul 21, 2022


मनमाड – येथून पाच किलोमीटरवरील दहेगांव शिवाराजवळील मनमाड  नगरपालिकेच्या कचरा डेपोजवळ,चोपडा यांचे कांद्याच्या खळ्याजवळ आज गुरुवारी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास  ४ वाहनांमध्ये विचित्र स्वरूपाचा अपघात झाला. मात्र यात कोणतीही जिवीतहानी किंवा कोणीही जखमी  झाले नसल्याचे समजते.
याबाबत प्रत्यक्षदर्शींकडून समजलेली माहिती अशी की, सिंदखेडा डेपोची बस मनमाडहून मालेगांवकडे जात असतांना ( क्र.एम एच २० बीएल ३९८०) या बसला मागाहून येणाऱ्या एका मालवाहू ट्रकने (ट्रक नं.एपी०९ एचजी ७६६३) ने ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात धडक दिली. व ट्रक पुढील नाल्यात जाऊन अडकली
यात बसच्या मागील भागाची काच फुटून नुकसान झाले. बसमधील प्रवाशांना उतरवून दुसर्‍या बसमधून रवाना करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले
दरम्यान हा अपघात घडलेला असतांनाच समोरून येणार्‍या ट्रॅक्टरने या थांबलेल्या मालट्रकला धडक दिली. त्यात ट्रॅक्टरच्या पुढच्या भागाचे नुकसान झाले. व यातच एक मोटरसायकलस्वारही याचवेळी येवून धडकला पण तोही सुखरूप बचावल्याचे समजते. यात प्रथमदर्शनी ट्रक चालकाची चूक असल्याची माहिती समोर आली आहे
या विचित्र अपघाताने मनमाड – मालेगांव मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. दहेगांव हे चांदवड तालुका हद्दीत असल्यामुळे मनमाड पोलीस याबाबत कोणतीही माहिती देऊ शकले नाहीत. पुढील तपास    चांदवड तालुका पोलिस करीत आहेत. 


अजून बातम्या वाचा..

माध्यमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्यादित,मनमाड चेअरमनपदी रामकृष्ण नागरे व व्हाइस चेअरमनपदी चेतन सुतार सर यांची निवड.

माध्यमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्यादित,मनमाड चेअरमनपदी रामकृष्ण नागरे व व्हाइस चेअरमनपदी चेतन सुतार सर यांची निवड.

  मनमाड:- मनमाड माध्यमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्यादित,मनमाड च्या चेअरमनपदी श्री.रामकृष्ण...

read more
छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश

छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश

. मनमाड भाजपा तर्फे आनंद जल्लोष कार्यक्रम शिवाजी महाराज यांच्या 12 किल्ल्यांचा युनेस्को च्या...

read more
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 किल्यांना युनेस्कोकडून “मराठा लष्करी भूप्रदेश” म्हणून मानांकन

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 किल्यांना युनेस्कोकडून “मराठा लष्करी भूप्रदेश” म्हणून मानांकन

*छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 किल्यांना युनेस्कोकडून "मराठा लष्करी भूप्रदेश" म्हणून मानांकन...

read more
.