loader image
[ays_poll id=7]

आजादी का अमृत महोत्सवातंर्गत
महावितरणतर्फे ‘उज्ज्वल भारत-उज्वल भविष्य’ महोत्सवाचे आयोजन

Jul 24, 2022


नाशिक : केंद्र शासनाच्या ऊर्जा मंत्रालय व राज्य ऊर्जा विभागाच्या वतीने आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत “उज्ज्वल भारत उज्ज्वल भविष्य” पॉवर २०४७ या ऊर्जा महोत्सवाचे राज्यभर आयोजन करण्यात येणार असून त्यानिमित्त जिल्हा प्रशासन व महावितरणतर्फे दिनांक २५ ते ३१ जुलै दरम्यान नाशिक जिल्ह्यात सुद्धा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त नाशिक जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील महावितरणच्या वतीने विद्युतीकरणाच्या विविध योजनांचा जागर महोत्सवात करण्यात येणार आहे.

या महोत्सवानिमित्त बुधवार दि. २७ जुलै रोजी सकाळी ११ वाजता ऑफिसर्स क्लब, एकलहरे निर्मिती केंद्र परिसर, नाशिक तसेच शनिवार दि. ३० जुलै रोजी सकाळी ११ वाजता महाकवी कालिदास कलामंदिर, नाशिक येथे आणि रविवार दि. ३१ जुलै रोजी सकाळी ११ वाजता श्री. स्वामी समर्थ मठ, श्री. आनंदनाथ महाराज चॅरीटेबल ट्रस्ट, सावरगाव, ता. येवला, नाशिक या तीनही ठिकाणी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनाअंतर्गत जिल्ह्यात मागील ८ वर्षात ऊर्जा क्षेत्रात झालेल्या भरीव कामांची माहिती देण्यात येणार आहे. तसेच ऊर्जाक्षेत्रातील आव्हाने आणि सन २०४७ पर्यंतचे ऊर्जेचे असलेले नियोजन हा या महोत्सवामागचा मुख्य उद्देश आहे.

कार्यक्रमात केंद्र व राज्य शासनाच्या योजनेचे लाभधारक आपले मनोगत व्यक्त करणार आहे. तसेच केंद्र शासनाने दिलेल्या आणि मराठी भाषेत अनुवादीत केलेल्या चित्रफीती दाखविण्यात येणार आहे. यासोबतच पथनाट्य, सांस्कृतिक कार्यक्रम, प्रदर्शने व पोस्टर्सद्वारे वीजक्षेत्रातील प्रगती व माहितीचा जागर या कार्यक्रमादरम्यान करण्यात येणार आहे. दिनांक ३० जुलै रोजी पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी हे ऊर्जा विभागाच्या विविध योजनांच्या लाभार्थ्यासमवेत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधणार आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यामध्ये वर्धा, कोल्हापूर, नंदूरबार गडचिरोली आणि नाशिक चा समावेश आहे. कार्यक्रमात ऊर्जा विभागाअंतर्गत वितरण क्षेत्रात वितरण प्रणालीचे बळकटीकरण (RDSS) या नविन योजनेची सुरूवात होणार आहे. आजादी का अमृत महोत्सव या तीनही कार्यक्रमांसाठी केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री, ना.डॉ. भारतीताई पवार यांची प्रमुख उपस्थिती तर महाराष्ट्रविधानसभा उपाध्यक्ष ना. नरहरी झिरवाळ यांची विशेष उपस्थिती असणार आहे. तसेच खासदार डॉ.सुभाष भामरे व हेमंत गोडसे, जिल्ह्यातील सर्व आमदार महोदय डॉ.सुधीर तांबे, नरेंद्र दराडे, किशोर दराडे, छगनरावजी भुजबळ, दादाजी भुसे, अँड.माणिकराव कोकाटे, दिलीप बोरसे, दिलीपराव बनकर, मोहम्मद इस्माईल अब्दुल खालिक, डॉ.राहुल आहेर, देवयानी फरांदे, सीमा हिरे, सुहास कांदे, नितीन पवार, राहुल ढिकले, सरोज आहेर व हिरामण खोसकर, महावितरणचे संचालक(प्रकल्प) प्रसाद रेशमे, जिल्हाधिकारी गंगाधरन डी., जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, महावितरणचे मुख्य अभियंता दीपक कुमठेकर, ऊर्जा मंत्रालयाचे पी.एफ.सी चे राजीव फरलिया उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रम आयोजनासाठी जिल्हा समन्वयक म्हणून महावितरणचे अधिक्षक अभियंते ज्ञानदेव पडळकर, रमेश सानप व संजय खंडारे यांनी नियोजन केले आहे.


अजून बातम्या वाचा..

नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या शहर पातळीवरील शालेय देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेला भरघोस प्रतिसाद

नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या शहर पातळीवरील शालेय देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेला भरघोस प्रतिसाद

मनमाड -- नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात...

read more
फलक रेखाटन – श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा !

फलक रेखाटन – श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा !

फलक रेखाटन - श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा ! फलक रेखाटन...

read more
मनमाड शहर भाजप मंडलाच्या वतीने सलग 21व्या वर्षी अखंड भारत दिनी निमित्त व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या जन्म दिना निमित्त आयोजित रक्तदान शिबीरात 30 रक्तदात्यांचे रक्तार्पण

मनमाड शहर भाजप मंडलाच्या वतीने सलग 21व्या वर्षी अखंड भारत दिनी निमित्त व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या जन्म दिना निमित्त आयोजित रक्तदान शिबीरात 30 रक्तदात्यांचे रक्तार्पण

मनमाड - 79 व्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्ये ला 14 ऑगस्ट या अखंड भारत दिना निमित्ताने...

read more
व्यसनाधीन तरुण देशाच्या शाश्वत विकासासाठी धोक्याचे जागतिक युवा दिनानिमित्त मनमाड महाविद्यालयात, पोस्टर रांगोळी व पथनाट्य यांचे सादरीकरण

व्यसनाधीन तरुण देशाच्या शाश्वत विकासासाठी धोक्याचे जागतिक युवा दिनानिमित्त मनमाड महाविद्यालयात, पोस्टर रांगोळी व पथनाट्य यांचे सादरीकरण

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या रेड रिबन क्लब, राष्ट्रीय...

read more
श्रावण मास अंगारक (मंगळी ) संकष्ट चतुर्थी निमित्त मंगळवार दिनांक 12/08/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात विशेष धार्मिक कार्यक्रमा चे आयोजन

श्रावण मास अंगारक (मंगळी ) संकष्ट चतुर्थी निमित्त मंगळवार दिनांक 12/08/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात विशेष धार्मिक कार्यक्रमा चे आयोजन

मनमाड - शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील...

read more
.