Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

केंद्रीय विद्यालय मनमाड : दहावीत हर्षदा लाड प्रथम

Jul 25, 2022

दिनांक २२ जुलै रोजी इयत्ता दहावीचा सीबीएससी चा निकाल जाहीर झाला. या परीक्षेत मनमाडच्या केंद्रीय विद्यालय मध्य रेल्वे विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. ६५ विद्यार्थी या परीक्षेला बसले होते. त्यापैकी ६३ विद्यार्थी उत्तम गुण संपादन करून यशस्वी झाले. हर्षदा लाड ९३.४ टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम, वंश कातकडे ९१. ६ टक्के गुण द्वितीय आला. तसेच मोक्षिता भंडारी व श्रेयस घाडगे ९१.२ टक्के तृतीय क्रमांक व आदिती देव ८९.६ टक्के मिळवत चतुर्थ क्रमांक मिळविला. मोहित लुनावत याने ८५.४ टक्के गुण मिळवून पाचवा क्रमांक मिळवला.
यशस्वी विद्यार्थ्यांचे रेल्वे कारखान्याचे मुख्य प्रबंधक व केंद्रीय विद्यालयाचे चेअरमन मयंक सिंग, प्राचार्य सुनील परदेशी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले. विद्यार्थ्यांना प्राचार्य सुनील परदेशी, विनोद माळी, अनिल झिंजवाडिया, मनोज मलासी, दिनेश जांगिड , सोनाली गुंडगळ इत्यादी शिक्षकांनी मार्गदर्शन केले.

अजून बातम्या वाचा..

लायन्स (रणरागिणी) क्लबचा कनाशी येथील मुलींचे वस्तीगृह येथे प्रजासत्ताक दिन साजरा

शबरीमाता वनवासी कल्याण आश्रम मुलींचे वस्तीगृह कनाशी येथे लायन्स क्लब आणि रणरागिणी क्लब यांनी भेट...

read more

ऑल इंडिया एस.सी./एस.टि.रेल्वे एम्प्लॉईज असोसिएशन ओपन लाईन मनमाड शाखेच्या प्रांगणात ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न\

आज दि.26/01/2022, "73" वा प्रजासत्ताक दिन ऑल इंडिया एस.सी./एस.टि.रेल्वे एम्प्लॉईज असोसिएशन ओपन...

read more
सेंट्रल रेल्वे मजदूर संघ कारखाना शाखा मनमाड कार्यालय मध्ये प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा

सेंट्रल रेल्वे मजदूर संघ कारखाना शाखा मनमाड कार्यालय मध्ये प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा

सेंट्रल रेल्वे मजदूर संघ कारखाना शाखा मनमाड कार्यालय मध्ये 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन मोठ्या...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]